वर थोडक्यांत लिहिलेल्या हकीकतीवरून दिसून येईल कीं, मुसलमानी राज्याचा मोड झाल्यानंतर हिंदुस्थानांत जो धामधुमीचा काळ प्राप्त झाला, त्याचवेळेस मूठभर मराठ्यांनीं--फार झाले तर एक लाख पर्येंत असतील--जहागिरी मिळविल्या व नवीन राज्यें स्थापिलीं, इतकेंच नव्हे, तर त्यांची इभ्रत अजून पूर्वीसारखीच कायम असून अद्यापि त्या इलाख्यांतील लोकसंख्येमध्यें हेच लोक कायते प्रमुख आहेत. परंतु किती झाले तरी त्यांच्या प्राबल्याप्त खास ओहटी लागली आहे, इतकें आपणांस कबूल करणें भाग आहे. ह्मणूनच मराठा मंडळांतील संयुक्त राज्य कर्त्यांपेक्षां मराठे लोकांच्याच सद्दीच्या काळाचें वर्णन करण्याच्या बाण्यानें जो इतिहास लिहिला आहे, त्या इतिहासांत तंजावरच्या राज्याची हकीकत असणें जरूर आहे.
दक्षिण हिंदुस्थानांत मराठ्यांचा प्रथम प्रवेश, इ. स. १६३८ मध्यें शिवाजीचा बाप शहाजी हा आला, त्यावेळेस झाला. त्यासमयीं शहाजी विजापूर येथील अदिलशाही बादशहाच्या पदरीं असून ते सैन्य घेऊन दक्षिणेंत आला होता. या कर्नाटकांतील लढायांमध्यें शहाजी व त्याचे ' सैन्य तीस वर्षेंपर्यंत गुंतलें होतें. शहाजीनें म्हैसूर, वेल्लूर, व जिंजी हे प्रांत जिंकून घेतले. या कामगिरीबद्दल बक्षीस ह्मणून बंगळूर, कोल्लार, सीरा उर्फ कत्ता व म्हैसूर प्रांतांतील आणखी कांहीं भाग इतकी जहागीर इ. स. १६ ४८ ते त्याला मिळाली. या लढायांतच मदुरा ' तंजावर येथील पुरातन ‘ नाइक' संस्थानिकांना विजापूरच्या बादशहास शरण येऊन खंडणी देण्यास शहाजीनें भाग पाडलें. शहाजीनें पुष्कळ वर्षें बादशहाची चाकरी केली व त्याजवर बरे वाईट पुष्कळ प्रसंग आले. पण इ. स. १६६ ४ त तो निवर्तला, तोंपर्यंत म्हैसूर प्रांतांतील जहागीर त्याजकडेच चालली. बंगळूर येथें शहानीचें मुख्य ठाणें असून, दक्षिणेंत आलेल्या मराठा सैन्याचा तळही बंगळूरासच होता. शहाजी मेल्यानंतर त्याचा मुलगा व्यंकोजी याकडे ही जहागीर आली. त्यावेळेस तंजावर व मदुरा येथील ‘नाईक ' राजांमध्यें प्राणघातक तंटे सुरू होऊन त्यांत तंजावरच्या राजाचा पराभव झाला, तेव्हां तो विजापूरच्या दरबाराकडे आश्रयासाठी गेला. त्या दरबारानें, राजास गादीवर बसवावें, अशी व्यंकोजीला आज्ञा दिली. तेव्हां बारा हजार सैन्य बरोबर घेऊन व्यंकोजीनें चाल केली व त्या शरणागत राजास गादीवर बसविलें. तथापि त्या राजाच्या पक्षांतील लोकांचे आपआपसांत कलह होऊन एका बाजूच्या लोकांनी व्यंकेजीस बोलावणें पाठविलें, तुह्मीं तंजावरचा प्रांत काबीन करा अशी त्याला विनंति केली. मराठ्यांचे सैन्य येतांच । तंजावरचा राजा पळून गेला. तेव्हां व्यंकोजीनें तंजावर घेतलें (इ. स. १६७४) व बंगळूर येथील ठाणें उठवून तंजावर मुक्कामीं नेलें. (इ. स. १६७५. )
तंजावर येथें व्यंकोजी राज्य करीत असतांना, एक विशेष लक्ष्यांत ठेवण्याजोगी गोष्ट झाली. ती इ. स. १६७६ मध्यें शिवाजीनें त्या प्रांतांवर स्वारी केली ही होय. व्यंकोजीचा निभाव न लागून ही कर्नाटकांतील वडिलोपार्जित जहागीर अनायासें शिवाजीच्या हस्तगत झाली. तंजावर व त्रिचनापल्ली येथील या जहागिरीवर शिवाजीचाच हक्क आहे असें विजापूर सरकारानेंही कबूल केलें. आपल्या सावत्र भावास जय मिळाला ह्मणून व्यंकोजीची अगदीं निराशा झाली, तेव्हां - बैरागी होऊन संसारत्याग करण्याचा त्यानें निश्चय केला; परंतु शिवाजीनें त्यास एक खरमरीत पत्र लिहून त्यांत “ तुझें कर्तव्य काय ? व तूं करितोस काय " अशा प्रकारें त्याची नीट कानउघाडणी केली. तेव्हां व्यंकोजीचें मन वळून बैरागी होण्याचा त्यानें हट्ट सोडला. यावेळेस आपल्या भावाचें समाधान व्हावें ह्मणून शिवाजीनें अत्यंत उदारपणानें वडिलोपार्जित उत्पन्नावरील सर्व हक्क व्यंकोजीस दिला. ह्या औदार्याचा परिणाम पाहिजे होता तसाच झाला. व्यंकोजी पूर्वींप्रमाणेच संस्थानचा उपभोग घेऊं लागला. तो इ. स. १६ ८७ त मरण पावला. या प्रसंगीं आपल्या कर्नाटकांतील जहागिरीचा विशेष बंदोबस्त शिवानीनें केला असता तर मराठा संघाचा एक प्रकारें फायदा झाला असता; परंतु या राज्याची व्यवस्था व्यंकोजीकडे सोपविल्यामुळें, संयुक्त मराठाराज्या, पासून तें संस्थान अगदीं अलग राहिलें. अर्थात्च तंजावरचें अत्यंत नुकसान झालें. व्यंकोजी कांहीं शूर नव्हता. तेव्हां म्हैसुराकडील दूरचीं ठाणीं आपल्या ताब्यांत ठेवण्याचें त्यास अवसान नसल्यामुळें त्यानें म्हैसूरच्या राज्यास बंगळूर देऊन टाकिलें व त्याच्या मोबदला अवघे तीन लाख रुपये व्यंकोजीस मिळाले. याप्रमाणें तंजावरच्या राज्याचे विभाग होऊन तें परकीय राजांच्या हातांत गेल्यामुळें, महाराष्ट्र-साम्राज्य मातेपासून या तंजावर बालकाचा कायमचा वियोग झाला. नंतर लवकरच, एका बाजूनें इंग्लिश व दुस-या बाजूनें म्हैसूरचे राजे हैदरअल्ली व त्याचा मुलगा टिपू , यांनीं या छोटेखानी राज्यास घेरून त्याची दुर्दशा करून सोडिली.