तंजावर येथें जेवढे राजे झाले, तेवढे सर्व विद्येचे मोठे पुरस्कर्ते होते. त्यांच्यापैकीं कांहीं तर प्रसिद्ध कवि व पंडितही होते. त्यांचें औदार्य पाहून मन अगदीं थक्क होऊन जातें. तंजावर येथें पुस्तकालय आहे, तसलें मोठें पुस्तकालय हिंदुस्थानांतील दुस-या कोणत्याही संस्थानांत नाहीं. गायन, वादन इत्यादि कलांचा उत्कर्ष होऊन त्या अगदीं पूर्णत्वास पावल्या होत्या. त्यावेळेस दक्षिणेमध्यें अतिशय सुधारलेला व उच्चत्वास पावलेला असा प्रांत ह्मणने तंजावर, अशी त्याची कीर्ति होती, व तशी अजूनही आहेच. तंजावरचें राज्य मोडल्यानंतर तेथील कलापंडित त्रावणकोरास गेले. त्रावणकोर संध्यां इतकें प्रसिद्ध आहे तें यामुळेंच. कुंभकोण नांवाच्या बड्या शहरांत प्रसिद्ध मराठा घराण्यांचा चांगलाच शिरकाव झालेला आहे, व त्याच घराण्यांतील सर. टी. माधवराव, दिवाण बहादुर रघुनाथराव, वेंका स्वामीराव, गोपाळराव इत्यादि थोर पुरुष आपआपल्या धंद्यांत मोठे यश संपादून कीर्तिमान झाले आहेत. काहींकांहींचा तर राजकार्यधुरंधरत्व, विद्वत्ता व परोपकारबुद्धि इत्यादि गुणांबद्दल हिंदुस्थानांत मोठा लौकिक झाला आहे. त्रावणकोर व म्हैसूर येथील हिंदु राजांनीं गेल्या व चालू शतकांतही ह्या मराठा मुत्सद्यांस उदार आश्रय देऊन त्यांच्या अंगच्या गुणांचा पूर्ण विकास होण्यास चांगल्याच ---- दिल्या आहेत. त्रावणकोरचे दिवाण, ‘ इंग्लिश सु-- " यांनीं केलेली कामगिरी सर्वांस माहीत आहेच त्यांच्यानं-- पुष्कळ दिवाण झाले, त्यांत सर. टी. माधवरावांनी राज्यांतील अव्यवस्था व त्याचा कर्जबाजारीपणा नाहींसा करून सर्वांनीं कित्ता घेण्याजोगें संस्थान केलें. दिवाण बहादूर रघुनाथरावांच्या वडिलांनींही म्हैसुर संस्थानांत अशीच कीर्ति मिळविली.
उत्तर अर्काटमध्यें एक 'अर्नी'ची छोटी जहागीर आहे. ती अजूनपर्यत एका ब्राह्मण संस्थानिकाकडेच चालत आहे. ह्या संस्थानिकाच्या पूर्वजांनीं दोनशें वर्षापूर्वी विजापुरकरांच्या पदरीं लढाईत कामगिरी बजावली म्हणून त्यांना ही देणगी मिळाली होती. त्यावेळीं अर्काटच्या नावाबाच्या पदरीं दुसरेही ब्राह्मण असून ते प्रसिद्धीस आले होते. त्यांना ‘ निजामशाही ब्राह्मण' म्हणत असत. तसेंच पदुकोटचें लहानसें मांडलिक संस्थान अजून चांगल्या स्थितींत आहे. त्यांत मराठ्यांची बरीच वस्ती आहे. या संस्थानची व्यवस्था ब्राह्मण दिवाणांनींच चालविली व ह्यापैकीं अतिप्रसिद्ध ब्राह्मण, दक्षिणेंत आलेल्या मराठा वसाहतवाल्यांच्या कुटुंबांतीलच होते. कोचीन संस्थानांत पुष्कळ मराठा लोक आहेत. पैकीं बरेच निरनिराळ्या जातीचें ब्राह्मण आहेत व त्यांनीं व्यापारधंदा चालविला आहे. बल्लारीप्रांतांत सोंदा नांवाचें एक लहानसें मराठा संस्थान आहे. दक्षिणेंतील मराठ्यांची सत्ता नाहींशी झाली तरी हें। संस्थान अजून हयात आहे. या संस्थानाचा संस्थापक प्रसिद्ध संताजी घोरपडे यांच्या वंशांतीलच होता. संतानीचा नातू मुरारराव घोरपडे यानें इ० स० १७५० च्या सुमारास कर्नाटकच्या लढाईत बरेंच शौर्य दाखविलें व गुत्ती येथील छोटें संस्थान हैदरअल्लीच्या ताब्यांत जाईपर्यंत त्यावर मुराररावानें राज्य केलें. औरंगजेबानें महाराष्ट्रावर स्वारी करून मराठ्यांना पेंचांत पाडलें, तेव्हां शिवाजीचा दुसरा मुलगा राजाराम जिंजी येथें शहाजीचा किल्ला होता तेथें पळून गेला. ह्याच किल्ल्यास सतराव्या शतकाच्या अखेरीस मोंगलांनी वेढा दिला, पण सात वर्षेंपर्यंत ह्या किल्यानें शत्रूंशीं झुंझून मराठ्यांचे रक्षण केलें. येवढ्या मुदतींत आपली थावराथावर करून मराठ्यांना मोगलांशीं लढण्यास चांगलीच फुरसत मिळाली.