दक्षिण हिंदुस्थानांतील मराठे.
प्रकरण १२ वें.
हिंदुस्थानच्या अगदीं दक्षिणेस तंजावर हें एक मराठा संस्थान आहे. तेथील राजघराणें हिंदुस्थानांतील इतर ठिकाणच्या घराण्यांपेक्षां फार पुरातन असून सुमारें दोनशें वर्षेंपर्यंत (इ. स. १६७५-१८५५ ) त्या घराण्याचा पश्चिम हिंदुस्थानांतील ‘ मराठा साम्राज्या' च्या संस्थापकांशीं अगदीं जवळचा संबंध होता. असें असूनही ग्रांट इफ साहेबानें किंवा एतद्देशीय मराठी बखरकारांपैकी एकानेंही या दक्षिणेकडील मराठावसाहतीची विशेष हकीकत कोठेंच दिलेली आढळत नाहीं. या दूरच्या हतभागी संस्थानाची चमत्कारिक हकीकत वाचली ह्मणने मराठा साम्राज्याची शक्ति, मराठी संस्थानांचा संघ होऊन जी एकी झाली त्यांतच आहे, असें जें आमचें मत आहे त्यास विशेष बळकटी येते. आपलें हित निराळें, आपली कर्तव्याची दिशा निराळी, अशा समजुतीनें जे या मराठा संघापासून अलग राहिले त्यांचा, परकीय किंवा एतद्देशीय इतिहासकारांनींही मराठ्यांच्या इतिहासांत, कोठेंच उल्लेख केलेला नाहीं. अलग राहण्याची ही प्रवृत्ति सृष्टिक्रमाविरुद्ध आहे व ती पासून खेदकारक क होईना पण बोध घेण्या जोगा आहे; तो ध्यानांत ठेवण्यासारखा आहे. कावेरी नदीच्या तीरांवरील ही दूरची मराठ्यांची लष्करी वसाहत होती. या वसाहतीपासून तिकडे जो एक शाश्वत परिणाम घडून आला त्याचें महत्व इ० स० १९८१ च्या सानेसुमारीवरून चांगलें लक्षांत येतें. या खानेसुमारींत मद्रास इलाख्यांत मराठे लोकांची संख्या सुमारें २,३०,००० होती. यांत म्हैसूर, कोचीन व त्रावणकोर येथील मराठे लोकांची संख्या (२०,००० ) मिळविली तर एकंदर बेरीन २,५०,००० पर्यंत होते. त्यांची वाटणी खाली लिहिल्या प्रमाणें झाली होती.
वाटणी तक्ता
वरील कोष्टकावरून असें दिसतें कीं, मद्रास इलाख्यांत, मराठे कायमचें ठाणें देऊन अमुक प्रांतांत राहिले नाहींत असा एकही प्रांत नाहीं. दक्षिण कानडा, मलबार, कोचीन व त्रावणकोर या --- णीं मराठ्यांची अडीच लक्ष वस्ती आहे, पण ती वसाहत समुद्रकिना-याच्या बाजूकडून झालीं आहे, व तिचा आणि इ. स. १६५० च्या सुमारास शहाजी व त्याचा मुलगा व्यंकोजी, शिवाजीचा सावत्र भाऊ, यांच्या सैन्यानें जें राज्य स्थापिलें, त्याचा कांही संबंध नाहीं. शहाजी व शिवाजी यांच्याबरोबर दक्षिणेंत पुष्कळ मराठे आले होते. तेव्हां त्यांचे वंशज, तंजावर शहर व त्याच्या भोंवतालचा प्रदेश, उत्तर अर्काट, सालेम व मद्रास शहर, या ठिकाणीं पुष्कळ आहेत. त्रावणकोरच्या महाराजांनीं तंजावरला, “ मराठ्यांचें दक्षिणेकडचे घर " असें मोठें छानदार नांव दिलें आहे. तेथील राज्य, कोणी वारस नाहीं म्हणून, खालसा होऊन जरी पन्नासांहून अधिक वर्षें झाली, तरी तेथील राण्या त्या शहरांतच राहत असून त्यांना ब्रिटिशसरकारांकडून कांहीं नेमणूक आहे. शिवाय त्यांचीं खाजगी जिनगीही बरीच आहे. इ. स. १६६६-१६७५ पर्येंतच्या काळांत हें राज्य स्थापिलें, तेव्हां या तंजावर प्रांतांत, दक्षिण अर्काट व त्रिचनापल्लीचा संपूर्ण प्रांत यांचा समावेश होत होता. ह्या लष्करी वसाहतवाल्यांमध्यें मराठे व ब्राह्मण दोघेही होते. व दोघेही आपल्या देशापासून लांब असल्यामुळें महाराष्ट्रांत त्यांच्या उपशाखा होऊन ने जातिभेद झाले होते ते येथें विसरून सर्वजण देशस्थ या नांवानें परस्परांशीं बांधिले गेले.