औरंगजेबाच्या मृत्यूनंतर लवकरच त्याचा मुलगा अझिमशहा यानें झुलपिकारखान यांच्या सल्ल्यावरून शाहूची सुटका केली, व त्यास मराठ्यांनीं आपला राजा कबूल केल्यास शाहूच्या आजानें विजापुरकरांकडून जिंकून घेतलेला “ स्वराज्य " नांवाचा प्रदेश त्याला देऊन भीमा व गोदावरी यांच्यामधील जहागिरीही देऊं असें वचन दिलें. मराठे सरदारांनीं “ शाहू आपला राजा " असें कबूल केलें व त्याला इ० स० १७०८ सालीं सातारा मुक्कामीं राज्याभिषेक केला. पुढें थोड्या वर्षांच्या आंतच शाहू महाराष्ट्राचा पूर्ण मालक झाला. फक्त कोल्हापूरप्रांत मात्र राजारामाच्या मुलाकडेच राहिला. दक्षिणेंतील मोंगलाच्या सुभेदारानें सहा परगण्यावरील चौथाईचा व सरदेशमुखीचा शाहूचा हक्क कबूल केला, व पुढील दहा वर्षांत बाळाजी विश्वनाथ पेशवे आणि खंडेराव दाभाडे-सणें चौथाई, सरदेशमुखी व स्वराज्य याबद्दलच्या योग्य सनदाही करून घे--पल्या
येणेंप्रमाणें या वीस वर्षेपर्यंत चाललेल्या ' स्वातंत्र्याच्या युद्धा-- शेवट गोड झाला. या युद्धापासून जीं फळें मिळालीं त्यांवरून पाहिलें-- असें दिसतें कीं, हीं वीस वर्षे ह्मणने मराठ्यांच्या इतिहासातील अति--- कीर्तिकर काळ होय. शिवाजीची गोष्ट निराळी. मोंगलांच्या एकंद-- सैन्याशीं शिवाजीस कधींही युद्ध करावें लागलें नाहीं. वास्तविक मोंगलांचा सरदार जयसिंग यानें जेव्हां त्यास अगदीं पेंचांत आणिलें तेव्हां स्वार्थत्याग करून शिवाजी खरोखर त्यांना शरणच गेला. शिवाय दक्षिणेंतील दोन राजांचा त्याला चांगला पाठिंबा असून मोंगलांना त्रास देण्यास त्यांचा त्याला उपयोग होई. इतकें असून लढाई करावयाची तीही डोंगिरी किल्ल्यांचा आश्रय धरून करावयाची. या सर्व गोष्टींत वरील स्वातंत्र्याचें युद्ध करून ज्या स्वदेशभक्तांनीं जय मिळविला, त्यांना कोणत्याही प्रकारें अनुकूल स्थिति नव्हती. शिवाजीचा स्वभाव व त्याचे पराक्रम यांच्यामध्यें कांहीं दैविक शक्ति असून, त्याच्या देशबांधवापैकीं एकाच्या हातूनही त्यास प्रतिबंध करितां आला नाहीं. असा एकादा पुढारीसुद्धां, वरील स्वदेशभक्तांना मिळाला नाहीं. मोंगलांच्या एकंदर सैन्याशीं त्यांना झुंझावें लागलें. त्या प्रबळ सैन्याचें अधिपत्य खुद्द , औरंगजेब बादशहाकडे. हिंदुस्थानांतील संपत्तीचीं साधनेंही त्याच्याच ताब्यांत. संभाजीच्या अति क्रूर व गैरशिस्त वर्तनामुळें त्यांच्यांतील अतिशय अनुभविक पुढारी मारले जाऊन त्याच्या अव्यवस्थेमुळें किल्ल्यांचीसुद्धां चांगली तयारी नव्हती. त्यांचा राजा मोंगलांच्या अटकेंत असून, स्वदेशांतून हाकलल्यामुळें परदेशांत जाऊन त्यांना आश्रय शोधावा लागला. वसूल नाहीं, सैन्य नाहीं, किल्ले नाहींत व द्रव्य मिळविण्याचें कोणतेंही साधन नाहीं, अशी स्थिति असतांही त्यांनीं नवें लप्कर जमा केलें, शत्रूपासून किल्ले परत घेतले व ---- जिंकण्याची एक नवीनच पद्धत काढली. तिच्यायोगानें त्यांना--- य मिळालें एवढेंच नव्हे, तर महाराष्ट्र व कर्नाटक या प्रदेशांत---- व सरदेशमुखी हेही हक्क मिळाले. ही लढाई करण्याची नवीन ---- न ती अमलांत आणणा-या लोकापैकीं राजाराम, प्रल्हाद निराजी,----ना घोरपडे इत्यादि पुष्कळ लोक हा झगडा चालू असतांच मृत्यु -----वले, पण त्यांची जागा ज्यांनीं घेतली, त्यानींही कळकळीनें काम करून शेवटीं यश संपादन केलें. औरंगजेबानें महाराष्ट्रावर स्वारी करून ही लढाई जशी जोरानें चालविली तशी चालविली नसती तर तंजावर येथील छोटेखानी संस्थानासारखेंच एक संस्थान पश्चिम महाराष्ट्रांतही स्थापलें गेलें असतें व त्या संस्थानचा राजा ह्मणने आपल्या पदरच्या बड्या सरदारांपैकीं एक सरदार आहे असें मानण्यास त्यास फावलें असतें. शिवाजीनें उत्पन्न केलेला हुरूप पुढच्याच पिढीला नष्टंप्राय होऊन गेला असता. एकोप्यानें न राहतां फूट करून राहण्याची जी प्रवृत्ति नेहमीं जोरांत आहे, तीच चालू राहून.मराठी राष्ट्राची रचना अशक्य झाली असती.