याप्रमाणें मह्मराष्ट्रांत राहून मोंगल बादशहास शरण न गेलेला मराठी राज्याचा मुख्य. प्रतिनिधि काय तो. हाच होता. आणखी एका ब्राह्मण पुढा-याचें नांव सांगितलें पाहिजे. तो शंकरानी मल्हार होय. त्याला संभाजीनें सचिवाची जागा दिली होती. इतर पुढा-यांबरोबर तो जिंजीस गेला व तेथें काही दिवस राहून काशीस गेला. शाहू गादीवर बसल्यानंतर सय्यद व मराठे यांच्या मध्यें तह जुळवून आणून शाहू राजाची एक विशेष कामगिरी त्याने बजाविली. वरील आणीबाणीच्या प्रसंगी नावारूपास आलेल्या ब्राह्मणपुढा-यांमध्यें, किन्हईचें कुलकर्णी व साता-या निल्ह्यांतील औंध येथील पंतप्रतिनिधि घराण्याचे पूर्वज, परशुराम त्र्यंबक, व भोर येथील पंत सचिव घराण्याचे पूर्वज शंकरानी नारायण, यांचीही गणना होते. मराठे पुढा-यांमध्यें संताजी घोरपडे, व धनाजी जाधव हेच मुख्य व यांच्यावरच जबाबदारी जास्त होती. हंबीरराव मोहिते याचे हाताखाली हे सरदार असून इ. स. १६७४ सालीं पन्हाळ्याजवळ लढाई झाली त्यांत जवळ जवळ पराभव झाला होता, तरी या सरदारांनी लगट करून जय मिळविला, यामुळें ते जास्त प्रसिद्धीस आले. तीस वर्षेपर्यंत मराठ्यांची शौर्याबद्दलची कीर्ति कायम । राखून ते मोंगल सैन्यांशीं एकसारखे झुंझले. राजाराम, प्रल्हाद निराजी इत्यादिकांबरोबर जरी ते जिंजीस गेले होते, तरी पण असें ठरलें होतें कीं, त्यांनीं परत महाराष्ट्रांत येऊन मोंगलांशीं सामना द्यावा व ते कर्नाटकावर चालून आल्यास किंवा त्यांनीं जिंजीवरहीं संकट आणल्यासं त्यांना प्रतिबंध करावा. व हाच मार्ग त्यांनीं स्वीकारिला होता. आतां ते लढत होते इतकेंच. त्यांच्याजवळ द्रव्य नसून ते जमा करण्याचीं साधनेंही त्यांच्याजवळ नव्हतीं. आपले स्वतःचे शिपाई, घोडेस्वार, दाणागोटा, दारुगोळा त्यांना आणावा लागून लढाईच्या खर्चाबद्दल लागणारा खजिनाही त्यांचा त्यांनाच मिळवावा लागे. म्हणून साहजिकच त्यांचे हातून पुष्कळ अत्याचार झाले. सर्व मोंगलं सैन्यांशीं लढून त्यांनी मोंगल छावणींत इतका दरारा उत्पन्न केला कीं, तें शतक संपण्याच्या आंतच मराठे लोक परत महाराष्ट्रांत येऊन त्यांनीं गुजराथ, माळवा, खानदेश, व-हाड, या प्रांतांवर स्वा-यादेखील केल्या आणि बादशहांच्या सैन्यास अगदीं जेरीस आणलें. या दोन सरदारांपैकी संताजी घोरपडा, हें 'स्वातंत्र्याचें युद्ध' संपण्याच्या आंतच, एका खाजगी वै-याकडून विश्वासघातानें मारला गेला. नंतर त्याच्या तीन भावांनीं आपल्या जोरावर लढाई चालवून, शेवटी गुत्ती व सूंद या लहानशा संस्थानांचें ते संस्थापक झाले. राहिलेला धनाजी मात्र, शाहू राजा आपल्या देशांत परत येऊन गादीवर बसेपर्यत जीवंत होता.
बाकी राहिलेल्या मराठे सरदारांत खंडेराव दाभाडे बरेच प्रसिद्ध आहेत. त्यांचे वडील तळेगांवचे पाटील असून शिवाजीच्या नोकरींत होते. राजारामाबरोबर जिंजीस गेलेल्या लोकांमध्यें हे होतेच, व महाराष्ट्राबाहेर गुजराथ व खानदेश या देशांत यांनींच प्रथम लदाई केली. त्यांचे एक मदतनीस, धार व देवास येथील पवार घराण्याचे मूळपुरुष, माळव्यांत शिरले. खंडेराव पुष्कळ वर्षे वांचले. दिल्लीच्या बादशहापासून शाहू महाराजाकरितां चौथाई व सरदेशमुखी यांच्या सनदा मिळविण्याकरितां थोरले बाजीरावसाहेब दिल्लीस गेले, तेव्हां त्यांचेबरोबर दाभाडे गेले होते. या युद्धांत कामगिरी बजाऊन प्रसिद्धीस आलेले दुसरे सरदार म्हटले म्हणजे, आठवले, सिधोजी नाईक निंबाळकर, परसोजी, भोसले ( नागपूरचे राजे यांचे पूर्वज ) व नेमानी शिंदे हे होत. त्याचप्रमाणें थोरात, घाटगे, थोके, महार्णव, पांढरे, काकडे, पाटणकर, बांगर, कद् आदिकरून पुष्कळ सरदार पुष्कळ वर्षे चाललेल्या या लढाईच् ! शिक्षणाने चांगले तयार झाले व त्यांनीं आपल्या देशाची उत्तम क'--• गिरी बजावली. राजारामाच्या मंत्रिमंडळानें या सरदारांना मोंगलाच्या ताब्यांतील मुलखांत चौथाई व सरदेशमुखी गोळा करण्याची परवानगी दिली. याप्रमाणें परसोजी भोंसल्यास गोंडवण व व-हाड प्रांतांत चौथाई वसूल करण्याची सनद दिली. निंबाळकरांकडे गंगथडी प्रदेश सोंपविला. दाभाड्यांचे स्वाधीन, गुजराथ व खानदेश हे प्रांत केले, व कित्येक सरदारांनीं, कर्नाटकांत व मोंगलाकडून नुकत्याच जिंकून घेतलेल्या प्रांतांत आपली ठाणीं दिलीं.