जिंजी.
प्रकरण ९ वें.
शिवाजीच्या अकालिक मृत्यूनें महाराष्ट्रावर जो दुर्धर प्रसंग लकरच ओढवला, तो मराठ्यांच्या इतिहासांतील दुसरा भयंकर प्रसंग होय. व त्या प्रसंगापासून जे अनर्थ झाले, त्यांची कल्पना खुद्द शिवाजीच्या वेळच्या लोकांपैकीं फारच थोड्यांस होती. पहिला दुर्धर प्रसंग म्हटला म्हणजे ज्यावेळेस राजा जयसिंग यास निमूटपणे शरण येण्याचे कबूल करून शिवाजी दिल्लीस गेला, व तेथें बादशहानें त्यासं कैदेंत घातलें त्यावेळचा होय. शिवाजीची कल्पना अचाट व संदी मोठी. म्हणून त्यास कैदेंतून आपली सुटका करून घेतां आली, इतकेंच नव्हे, । तर, शिवाजीचा पक्का मोड होईपर्यत, तो मोठा बलाढ्य आहे, त्यास कसेंबसें अजारून गोंजारूनच घेतलें पाहिजे, असें खुद्द औरंगजेब बादशहासही कबूल करावें लागलें. महाराष्ट्रासंबंधी औरंगजेबाचे काय काय बेत होते, ते शिवाजीस पक्कें माहीत; म्हणून त्याच्या आयुष्याची शेवटचीं बारा वर्षे, औरंगजेबाकडून येणारा हल्ला अंगावर घेऊन त्याचा प्रतिकार करण्यास पुरेइतकी आपल्या लोकांची तयारी करण्यांतच गेलीं. दक्षिणेंत विजापूरकर व गोवळकोंडेकर यांच्याशीं चाललेलीं अगदी हाडवैराचीं मांडणें विसरून, शत्रूवर हल्ला करणें झाल्यास किंवा शत्रूपासून आपला बचाव करणें झाल्यास ऐकमेकांनी एकमेकांस मदत करावी, अशा अर्थाचा तहनामा शिवाजीनें नपासून करून घेतला. या तहनाम्याच्या योगाने मोंगल सरदारांचें परतून लावण्याचें कामीं शिवाजीची त्यांना पुष्कळ मदत मिळून फायदा झाला. व त्यानें केलेली कामगिरी मनांत आणून # शिवाजीस खंडणी देण्याचेंही कबूल केलें. जणूकाय पुढें घड. घडणा-या गोष्टींचे पूर्वज्ञान त्यांस झाले होतें-नवीन मुलूख मिळवून व
पान फाटले आहे.
नवीन स्नेह संपादून दक्षिणहिंदुस्थानांत कावेरी नदीच्या प्रदेशांत आत्मसंरक्षणासाठी एक नवीनच स्थल त्यानें तयार ठेविलें, अशासाठीं कीं, त्याठिकाणी संकटसमयी आपणास आश्रयास जातां यावें. तसेंच सह्याद्रीच्या घाटावरील सर्व डोंगरी किल्यांची डागडुजी करून ते दुरुस्त ठेविले. शिवाजीची लढाऊ गलबतें व त्यावरील नायक हे आत्मसंरक्षणाचें त्याचें दुसरें साधन होतें. यांहीपेक्षां, शिवाजी जेथें जाईल तेथें त्याच्या पाठोपाठ जाण्यास, पुष्कळ शिक्षण देऊन तयार केलेले लोक, तसेंच शिवाजीच्या ठिकाणीं दृढ प्रेम ठेऊन, त्याचे मनांतील हेतु काय आहेत ते अगोदरच बिनचूक समजून ते कसे तडीस न्यावेत हें जाणणारे त्याचे नोकरचाकर, सर्व जातीमध्यें त्यानें जागृत केलेली स्वातंत्र्याची चाड व त्यांच्या ठिकाणीं उत्पन्न केलेला इमानीपणा–हेंच शिवाजीच्या शक्तीचे मुख्य आधार होत, व ही शक्ति सर्वांत श्रेष्ठ आहे असें त्याचे मित्रच नव्हेत तर शत्रूदेखीलं कबूल करीत. शिवाजीस मृत्यूनें अकस्मात् व अकालींच गांठल्यामुळे आपल्या पश्चात् राज्यांचा वारसा कोणाकडे जावयाचा र। योग्य व्यक्स्था करण्यास त्यासं सवड मिळाली नाहीं. त्याचा व मुलगा संभाजी अत्यंत दुर्वर्तनी होता. शिवाजीच्या आज्ञा मोडून तो मोंगल सरदारांच्या आश्रयास जाऊन राहिला होता. मोंगल छवणींतून परत आल्यावर रायगड येथील प्रधानमंडळानें संभाजीस पन्हाळा किंल्ल्यावर मोठ्या बंदोबस्तानें अटकेंत ठेविलें. शिवाजीनें आरंभिलेलें कार्य तसेच पुढें चालविण्यास संभाजी हा दुष्ट स्वभावामुळें व वाईट वागणुकीमुळें अगदीच नालायख आहे असें त्या प्रधानमंडळीस समजून आले, व त्यांनी संभाजीस बाजूस ठेऊन, शिवाजीचा धाकटा मुलगा राजाराम यासं गादीवर बसविण्याचा बेत केली; परंतु या प्रधानमंडळानें उतावीळपणा केला. सैन्यांतील लोकांस आपल्या कटांत घेतले नाहीं, ही त्यांनीं मोठी चूक केली. ही मोठ्या दुर्दैवाची गोष्ट होय. सेनापती हंबीरराव मोहिते त्यांच्या मसलतींत नव्हता, ह्मणूनच हा त्यांचा सर्व बेत फसला. शिपाई लोकांच्या साहाय्याने संभाजी पन्हाळा किल्लयांतून निसटला, व रायगड येथींल प्रधानमंडळाच्या प्रतिबंधास न जुमानतां त्यानें गादी बळकाविली. गादीवर बसल्यानंतर जीं त्यानें अनन्वित कृत्यें केलीं, त्यावरून भावी संकटप्रसंगीं लोकांचा पुढारी होण्यास तो अगदींच अयोग्य होता असें दिसून आलें. त्यानें आपल्या सावत्र मातुश्रीस उपासमार करून ठार मारलें. पूर्वीचे पेशवे, सचिव व सुमंत यांस बंदींत टाकिलें व शिवाजीच्या वेळच्या जुन्या चिटणीसास ठार केलें. हीं त्याचीं क्रूर कर्मे त्याच्या सर्व कारकीर्दीभर चालू राहून, त्याच्या बापाच्या वेळेस मोठ्या हुद्यास चढलेल्या सर्व लोकांची त्याच्यावरील प्रीति नाहींशी झाली. संभाजी जात्या फार शुर, तेव्हां एखादे वेळेस लोकांस असें वाटे कीं, संभाजी कितीही क्रूर असला तरी आसपासच्या राष्ट्रांशी चाललेल्या लढायांत मराठ्यांची इभ्रत व त्यांचें वजन कायम राखील; परंतु ही त्यांची आशा केव्हांही फलद्रूप झाली नाहीं.