ईश्वराशीं मनुष्याच्यासंबंधाच्या या कल्पनेचा असा परिणाम झाला कीं, ईश्वर व ईश्वराविषयीं ज्ञान संपादन करण्यास भक्तीसारखें दुसरें साधन नाहीं असें सिद्ध होऊन, वैष्णव पंथांतील लोकांची, भक्ति हीच धर्माची मुख्य बाब होऊन बसली. महिपतीनें लिहिलेलीं सर्व चरित्रें पाहिलीं तर बाह्यपूजा व त्यांतील सर्व विधि उपचार, यात्रा, तीर्थस्नान, नम्रपणा धरणें, उपास करणें, विद्यार्जन, चिंतन, ध्यान, या सर्व साधनांपेक्षां भक्ति व भाव या साधनांचें महत्व जास्त आहे असें सांगितलें नाही, असें एकही चरित्र सांपडावयाचें नाहीं. वरील साधनांचा संबंध शरीर किंवा मन यांशींच फक्त असतो; पण आत्म्यानें आपली सेवा करावी अशी ईश्वराची इच्छा असते. भोजन करणें, पाणी पिणें, झोंप घेणें इत्यादि गोष्टी जशा आह्मीं त्याविषयीं श्रम न घेतां व काळजी न बाळगतां करतों, तसेच हे सर्व विधिउपचार इत्यादि बाह्य प्रकार आपणास सहन करितां येतात. त्यांचा आत्म्याशीं ..कांहीं संबंध नाहीं. आपल्या सर्वांगास आंत बाहेर व्यापून टाकणा-या ईश्वराच्या अस्तित्वरूपी समुद्रांत जेव्हां आपली सर्व इंद्रियें स्नान करितात तेंच श्रेष्ठ तीर्थस्नान. ईश्वराच्या इच्छेचे आह्मीं बंदे चाकर ; आह्मी सर्वस्वी ईश्वराचे स्वाधीन ; आमचें स्वतःचें कांहीं नाहीं; असा जो आमचा स्वार्थत्याग हाच आमचा यज्ञयाग वे हीच आमची दानदेणगी. ईश्वरापुढें आत्मा नम्र करणें हाच नम्रपणा व त्याच्या वैभवाचें होईल तितकें कीर्तन करणें हेंच त्याचें चिंतन. ज्ञानार्जन, योगशक्ति, शारीरिक संपत्ति, धनदौलत, मुलेंबाळें, जमीनजुमला, यांची जन्मगरणापासून मुक्तीचीसुद्धां-इतकी मातबरी नाहीं. ईश्वरावर व मनुष्यप्राण्यादिकरून सर्व सृष्टवस्तूंवर दृढ प्रेम असणें हेंच इष्ट आहे. नामदेव एकदा एका झाडाची साल काढीत असतां कु-हाडीचा घाव जेथें झाला होता त्या जाग्यांतून रक्त आलें असें त्यास वाटून ते मोठ्यानें ओरडला. आणि घाव मारला तेव्हां झाडास कसें वाटलें असावें ते समजावें, ह्मणून त्यानें आपल्याच अंगावर कु-हाड मारून घेतली. शेखमहमदास त्याच्या बापानें खाटिकाचा धंदा सुरू करण्यास पाठविलें, तेव्हां जनावरांस मारतांना किती वेदना होतात हें समजावे ह्मणून त्यानें सुरीनें आपले बोट कापलें. तेव्हां त्यास तें दुःख कळून त्यानें खाटिकाचा धंदा सोडून दिला, व पोटाची खळगी भरण्याकरिता ज्य! जगांत दुस-यास इतकें दुःख द्यावें लागतें, त्या जगापासून अलिप्त राहिला. तुकारामास शेतांत पाखरें राखण्यास पाठविलें, तेव्हां त्यास पाहून पांखरें उडून गेलीं. तुकारामास वाटलें की आपणास पाहून पांखरें ज्याअर्थी उडून गेलीं, त्याअर्थी आपल्याच अंगांत कांहीं दोष असावा. या संतांच्या वेळेस जे लोक नव्हते त्यांना हा मनाचा थोरपणा व सर्वाशी स्वार्थत्याग खरासुद्धां वाटणार नाहीं. पण ही गोष्ट खरी आहे याबद्दल कांहीच शंका नाहीं व या नमुन्यावरूनच पारमार्थिक श्रेष्ठत्वाची राष्ट्रीय उदात्त कल्पना बनून गेली होती याबद्दलही शंका नाही. आमच्या सध्याच्या कालांत, इतका नम्रपणा, इतका स्वार्थत्याग उपयोगी नाहीं, इतकी कंवर ढिली होणें, इतकें सोशिक होणें इष्ट नाहीं-हें कदाचित् खरें असूं शकेल; पण साधुसंतांस होऊन आज दोनशें वर्षांवर अधिक वर्षे होऊन गेलीं, तेव्हां त्यांची हकीकत लिहितांना आमच्या गरजांचें व आमच्या इच्छित वस्तूंचें घोडें पुढें ढकलणें प्रशस्त नाहीं.
आमच्या साधुसंतांचे आचारविचार व संभाषण यांची दिशा काय असे वे मुसलमानी धर्मासारख्या युद्धप्रवृत्त धर्माशीं गांठ पडून आलेल्या संकटांशी त्यांनी कशी टक्कर दिली व अखेरीस कसे विजयी झाले हें पाहणें मोठें चित्तवेधक आहे. नामदेव, एकनाथ, रामदाम इत्यादिकांच्या चरित्रांत तर अशा गोष्टींची रेलचेल आहे. विशेष लक्ष्यांत ठेवण्यासारखी गोष्ट ही की पुष्कळ मुसलमान लोकांनी हिंदुधर्म स्वीकारिला व त्यायोगें ते इतके प्रसिद्धीस आले कीं त्यावेळच्या ग्रंथकर्त्यांनी हिंदुसंतांच्याप्रमाणें या गहमदीय संतांचेंसुद्धां साहाय्य घेतलें आहे. महगदीय संतमंडळींचा सन्मान करून त्यावेळच्या आमच्या हिंदू लोकांनीं जो मनाचा थोरपणा दर्शविला, त्याचीं उदाहरणें शेखमहमद व कबीर हीं होत. त्याचप्रमाणें तुकाराम व एकनाथ यांच्यावर मुसलमानाशी संघट्टनाचा इतका परिणाम झाला की या संतांनीं उर्दू भाषेंत कविता केल्या. त्या कवितेंतील थोर तत्वें अगदीं कट्टया मुसलमानांनासुद्धां अग्राह्य नाहींत. रामदासाचा शिष्य उद्धव बेदर मुकामीं संकटांत सांपडला, तेव्हां समर्थानींही तसेंच केलें. बेदरच्या बादशाहाना नोकर दामाजीपंत याची सर्वास माहिती आहेच. दुष्काळ पडला तेव्हां सरकारचें धान्य त्यानें गरीब लोकांस वांटून टाकलें. या अपराधाबद्दल त्यास शिक्षा करण्याची वेळ आली तेव्हा त्या धान्याची एकंदर किंमत राजाच्या खजिन्यांत चमत्कारिक रीतीनें जमा होऊन बिचा-या दामाजीची सुटका झाली. परधर्मी राजाशीं चाललेल्या झगड्यांत साधुसंतांसच अखेर जय मिळाला व त्यांची सरशी झाली. ही त्यांची सरशी, युद्धानें किंवा विरोधानें नव्हे, तर ईश्वरावर सर्वस्वी हवाला ठेविल्यानें झाली. मुसलमानांचा अल्ला काय व हिंदु लोकांचा राम काय. दोन्ही देव एकच. कोणी दुस-या देवाचा द्वेष करूं नये, अशा त-हेनें समेट होण्याकडे प्रवृत्ति होऊं लागून, शिवाजी रंगभूमीवर आला, तेव्हां तर हें समेट बहुतेक पूर्ण झालेंच होतें. तरी पण मुसलमानी धर्मवेड अगदींच शांत नसून त्यास मधून मधून उकळी फुटत असे.