दत्ताजी गोपीनाथ हा मंत्री असून शिवाय वाकनीशीचें काम करीत होता. शिवाजीच्या खाजगीची सर्व व्यवस्था याचेकडेच असे. यासच । शिवाजीनें अफझुलखानाकडे वकीलीस पाठविलें. होतें. त्यावेळी यानें शिवाजीची फार महत्वाची कामगिरी बजाविली. मराठ्यांच्या इतिहासांत पुढें प्रसिद्धीस आलेला सखारामबापू बोकील हा या दत्ताजी गोपीनाथाचाच वंशज होय.
राघोजी सोमनाथाकडे व-हाड प्रांतांतील मुलूखगिरीचें काम होतें. कोंकणांतील लढाईवरही ते केव्हां केव्हां जाई. राघोजीचा बाप सोमनाथ हा डबीर असून परराष्ट्राशीं स्वराज्याचे हिताहितसंबंध पाहण्याचें कामही याजकडेच होतें. सोमनाथ मेल्यावर ही दोनही कामें शिवाजीनें जनार्दनपंत हणमंते यास सांगितली.
नीराजी रावजी हा न्यायाधीश होता व याचा मुलगा प्रल्हाद हा गोवळकोंड्याच्या दरबारीं शिवानीचा वकील होता. राजारामाच्या कारकीर्दीत प्रल्हादरावानें जिंजीस वेढा पडला असतां जिंजीचा बचाव फार उत्तम रीतीनें केला, म्हणून राजारामानें त्यास पंतप्रतिनिधि केलें.
जे प्रभू वीर व मुत्सुद्दी त्या काळीं उदयास आले त्यांत मुरारजी रावजी, बाजी प्रभू व बाळाजी आवजी ही त्रैमूर्तीच फार प्रसिद्ध आहे.
मुरारजी बाजी हा पंढरपूरचा किल्लेदार होता. दिलरखानानें जेव्हां पंढरपुरास वेढा घातला, तेव्हा या वीरानें मोठ्या शौर्यानें स्वत : चा प्राण खर्ची घालून त्या शहराचें संरक्षण केलें. बाजी प्रभू हा प्रथम शिवाजीच्या शत्रूच्यापक्षाकडील होता; पण पुढें ते शिवाजीचा फार विश्वासू नोकर बनला. आपला हातावर तुरी देऊन शिवाजी पन्हाळा सोडून रायगडास गेला हें वर्तमान समजतांच, शिवाजीस धरण्यास आलेल्या विजापूरच्या सरदारानें शिवाजीचा पाठलाग आरंभिला. मोंगलांच्या तडाक्यांतून सुटून शिवाजी रायगडास सुरक्षित कसा पोंचतो अशी प्रत्येकास भीति वाटूं लागली. प्रसंग फार कठीण आला, पण अशावेळीं बाजी प्रभूनें बाजू राखली. शिवाजी महाराज रायगडास सुखरूप जाऊन पोंचल्याच्या तोफा ऐकूं येईपर्यंत मुसलमान फौजेचा रस्ता बंद करावयाचा असा मनाचा पक्का निर्धार करून हा शूर वीर रस्त्यावरील एका अवघड खिंडीच्या तोंडाशी फक्त १००० लोकांनिशी उभा राहिला. विजापूर सरदाराच्या अवाढव्य सैन्यानें आपली होती नव्हती तेवढी अक्कल खर्च केली, पण या बहादरानें त्यास एक पाउलही पुढें टाकूं दिलें नाहीं. किती तरी जखमा लागल्यामुळें हा वीर रक्तानें अगदी न्हाऊन गेला होता. ह्यांच्या अंगीं उभा रहाण्याचीही ताकद राहिली नव्हती. तरीही रांगण्यावरील तोफ ऐकेपर्यंत त्याणें रणांगण सोडलें नाहीं. शेवटची तोफ ऐकली तेव्हां या वीरानें आपला प्राण सोडली. कायही स्वामिभक्ति आणि काय हा स्वदेशाभिमान. अशीं नररत्नें शिवानीच्या साहाय्यास नसतीं तर शिवाजीच्या हातून काय झालें असतें ? ग्रीसच्या इतिहासांत झर्झीजच्या सेनासागरापुढें ३०० स्पार्टन लोकांनी थर्मापायलीच्या खिंडीत दाखविलेला पराक्रम वाचून थक्क होणारे लोक या बाजी प्रभूस लीओनि:डमची योग्यता देतात यांत नवल नाहीं.