स्वार्थास झुगारून देणारा जाज्वल्य धर्माभिमान, आरंभिलेल्या महत्कार्यात परमेश्वर आपला पाठीराखा आहे असा पूर्ण विश्वास असल्यानें उत्पन्न झालेलें विलक्षण धैर्य व धाडस, महाराष्ट्रीयांस बंधुप्रेमानें जखडून टाकून त्यांस विजयश्रीच्या गळ्यांतील ताईत बनविणारी अलौकिक शक्ति, त्यावेळच्या उणीवा तेव्हांच समजण्यासारखी दुर्मिळ कुशाग्र बुद्धि, कितीही संकटे आली तरी हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा कृतनिश्चय, यूरोपांतील किंवा हिंदुस्थानांतील कोणत्याही इतिहासप्रसिद्ध पुरुषांत आढळून न येणारें प्रसंगावधान व योजना, खरा खदेशाभिमान आणि सदयतेनें न्याय करण्याची इच्छा हे गुण शिवानीच्या अंगीं होते, ह्मणूनच ज्या सत्तेनें पुढें त्याचे सर्व हेतु सिद्धीस नेऊन दिगंत कीर्ति मिळविली व हिंदुस्थानच्या इतिहासांत मराठ्यांचे नांव अजरामर करून टाकलें, अशी सत्ता स्थापन करतां आली. मराठी साम्राज्याच्या संस्थापकाच्या स्वभावाचें आपण येथपर्यंत थोडक्यांत परीक्षण केलें. त्याच्या स्वभावाची आपणास बरीच ओळख झाली. आतां आपणास या वीरनायकाचें चरित्र बरोबर समजेल, व त्याचे हातून घडलेल्या कांहीं विवक्षित गोष्टींच्या योग्यायोग्यतेचा विचार करण्यास मुळींच अडचण पडणार नाहीं.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57