केव्हांही पहा हिंदुस्थानांत परकीयांचा शिरकाव हिंदुलोकांच्या आपसांतील दुही मुळेंच झालेला आहे. व्यवस्थितपणा कसा ते हिंदू लोकास मुळींच माहीत नाहीं. जुटीनें काम करण्याची त्यांस कधींच सवय नाहीं. कांहीं विवक्षित नियम ठरवून त्याप्रमाणें बिनबोभाट चालण्याचा त्यांस मनापासून तिटकारा. जात्याच असे दुर्गुण हिंदूलोकांच्या अंगीं असल्यामुळें व्यवस्थित रीतीनें तयार केलेल्या सैन्यापुढें हिंदूची सत्ता टिकली नाही, यांत नवल नाहीं. हिंदूलोकांतील हे दोष नाहींसे करून लहान सहान गोष्टीपासून ते तहत मोठमोठ्या राजकारस्थानापर्यंत प्रत्येक बाबींत समाजाचें हित तें व्यक्तीचें हित, समाजाचा उत्कर्ष तोच व्यक्तीचा उत्कर्ष, समाजाचा अपमान ते व्यक्तीचा अपमान, असें प्रत्येक मनुष्यास वाटूं लागावें, म्हणून शिवाजीची सारखी खटपट चालू होती.
घाटगे, मोरे, घोरपडे वगैरे मराठे सरदारांस स्वहितावांचून कांहीं दिसत नव्हतें. समाजहिताची त्यांस बिलकुल पर्वा नव्हती. कांहीं तरी युक्तिप्रयुक्तीनें या लोकांस हतवीर्य केल्याशिवाय शिवाजीचा इष्टहेतु कधींच साधला नसता. या लोकांचे जेव्हां शिवाजीनें पूर्ण पारिपत्य केंल तेव्हांच इतर मराठे सरदार समाजहिताकरितां स्वहिताची आहुति देण्यास तयार झाले. एका मुसलमानी राज्यास दुस-या मुसलमानी राज्याशीं झुजविण्यांत तरी शिवाजीचा हाच हेतु होता. जरी प्रसंगी कमजोर झाल्यामुळें शिवाजीस हार खावी लागली, तरी महाराष्ट्रमंडळांत एकी करून त्यांच्या मनांत साम्राज्याची कल्पना पक्केपणीं बिंबविण्याचा आपला हेतु त्यानें कधींच सोडला नाहीं. हा हेतु साधतांना कांहीं ठिकाणी शिवाजीसही अपयश आलें, हें खरें; परिणामीं शिवाजीनें लावलेल्या वृक्षास त्याच्या इच्छेनुरूप गोड फळें आली नाहींत यांत शंका नाहीं ; पण त्याणें जी इमारत चढविली, ती इतकी वळकट बांधलेली होती की बराच काळपर्यत तीस अगदी धक्का लागला नाहीं. मोंगल बादशाही सारखी बलाढ्य राज्यें परचक्रापुढें लयास गेलीं; पण शिवाजीनें स्थापलेल्या ' साम्राज्यानें ' मात्र परकीयांस दोन हात दाखविले.
तीन शतकें कष्ट काम करून तयार केलेल्या जमिनीत स्वराज्यरूपी वृक्षाचें बीं कसें पेरलें, या गोष्टीचा विचार संपविण्यापूर्वी आणखी एका गोष्टीचा उल्लेख केल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. ही गोष्ट म्हणजे शिवाजीच्या अंगीं आढळून येणारी विलक्षण आकर्षणशक्ति. मानवी जातीच्या ख-या पुरस्कर्त्यांतच ही शाक्ति आढळते; केवळ लुटारू धर्मवेड्या लोकांत ती कधींच दिसून येत नाही. ज्यांना ज्यांना भावी सुखाची आशा व इच्छा होती, त्या सर्वांची मनें शिवानीनें आपल्याकडे ओढून घेतली होतीं. ज्या जातीवर देशाची सारी भिस्त अशा प्रमुख प्रमुख जातीमधून शिवानीनें आपले प्रधानमंडळ निवडून काढले होतें. शिवाजीची दृष्टभेट होतांच यःकश्चित् मनुष्यही स्वदेशभिमानानें वेडावून जाई. मावळे, हेटकरी वगैरे लोक केवळ लुटीकरितां शिवाजीच्या प्राणास प्राण देण्यास तयार झाले नव्हते. कांही प्रसंगी तर शिवाजीनें मुसलमनांकडूनही आपला कार्यभाग करून घेतला आहे. तानाजी व सूर्याजी मालुसरे, बाजी फसलकर, नेताजी पालकर वगैरे मावळे ; बाजी देशपांडे, बाळाजी आवजी वगैरे प्रभू; मोरोपंत, आबाजी सोनदेव, अण्णाजी दत्तो, रघुनाथ नारायण, जनार्दनपंत हणमंते वगैरे ब्राह्मण; प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे धनाजी जाधव व परसोजी भोसले, उदाजी पोवार खंडेराव दाभाडे यांचे पूर्वज वगैरे मराठे शिवाजीच्या सैन्यांत होते. यापैकी एकानेंही शिवाजीशीं निमकहरामपणा केला नाहीं. हा कशाचा परिणाम ? शिवाजीच्या अंगी असलेल्या अलौकिक गुणांचा व शक्तीचा नव्हे काय ? शिवाजी दिल्लीस मोंगलांच्या कैदेंत होता, तरी इमानास जागून या लोकांनी आपआपली कामें योग्य प्रकारे बजाविली व ते सुटून परत स्वदेशास आल्यावरही त्याची सत्ता पुन : स्थापण्यास त्यास त्यांणी साहाय्य केले. शिवानीच्या मरणानंतर त्याचा दुष्ट व कुमार्गी मुलगा संभाजी याप्त मारून, रायगडाहून शाहूस में गलांनीं कैद करून नेले, तरीही हे वे यांचे मागून आलेले दुसरे लोक मोंगलांशी मोठ्या हिमतीने व निकराने लढले. जरी त्यास दक्षिणेकडे मागे हटावे लागले, तरी जसा एखादा वाघ भक्ष्यावर उडी घालण्यापूर्वी थोडासा मागें सरतो, त्याप्रमाणें त्यांणीं मागें सरून पुन : अधिक त्वेषानें औरंगजेबावर चाल केली व त्याचा पूर्णपणें पाडाव करून, दक्षिण जिंकण्याच्या त्याच्या सर्व आशा समूळ नाहीशा केल्या. शिवानीचें शौर्य, सर्वांवर छाप ठेवण्याची त्याची शैली जशी अलौकिक होती तसेंच त्याचें आत्मसंयमन हे अलौकिकच होतें. त्या वेळच्या लोकसमाजाची नीतिबंधने शिथिल अमतांही शिवाजीच्या अंगीं हो स्वसंयमन शक्ति होती, हे केवढें आश्चर्य. लढाईच्या सोईसाठी किंवा पैशाच्या लालुचीनें शिवाजाच्या सैन्यानें बरीच अति निंद्य कृत्यें केलीं; पण गाई, अबला व गरीब रयत यांस त्यांणीं कधीच त्रास दिला नाहीं. स्त्रियांस तर ते फार अदबीनें वागवीत. एखादेवेळी लढाईत त्या सांपडल्या, तर त्यांस बहुमानानें त्यांच्या नव-याकडे पोंचविण्यांत येत असे. जिंकलेला प्रदेश त्याणें कोणास कधींच जहागीर करून दिला नाहीं. अशा जहागिरी दिल्या , तर हे जहागीरदार सर्व सत्ता बळकावून बलाढ्य होतील व पुनः आपसांत कलह उत्पन्न होऊन स्वराज्यास धक्का पोंचेल असें शिवाजीस ठाम वाटत होते. वेळोवेळी अशा जहागिरी देण्याबद्दल त्याचे प्रधानांनी त्यास सुचविलें; पण तिकडे त्याणें बिलकुल लक्ष दिलें नाहीं. शिवाजीनें । घालून दिलेला हा कित्ता जर शिवानीनंतरच्या राज्यचालकांनी अक्षरशः गिरविला असता, तर ज्या राष्ट्ररूपी इमारतीचा पाया शिवाजीनें मोठ्या अकलेनें घातला, त्या इमारतीचा एक एक भाग निराळा होऊन ती इमारत इतक्या लवकर कोसळली नसती.