अशा प्रकारची त्यावेळीं महाराष्ट्राची परिस्थिति होती. चोहीकडे धर्मजागृति होऊन आर्य धर्माच्या शुद्धतत्वाप्रमाणें चालण्याचा लोकांचा निर्धार झाल्यानें जुन्या वेडगळ समजुतीस पूर्णपणें फाटा मिळत चालला होता. ह्या नवीन तत्वांनीं लोकांची मनें प्रकाशित झाल्यानें, कोणतीही गोष्ट त्यांच्यावर जुलुमानें लादणें दुरापास्त झालें होतें. पूर्वीप्रमाणें कोणतीही गोष्ट निमुटपणें कबूल करण्यास लोक आतां तयार नसल्यामुळें, मुसलमानांनी चालविलेला धर्मछले त्यांस अधिकचे असह्य वाटूं लागला होता. मुसलमानांस पुन: असा छल महाराष्ट्रांत करूं द्यावयाचा नाहीं असा लोकांचा दृढ निश्चय झाला होता. कोल्हापूर व तुळजापूर येथील भवानी देवीच्या उपासकांनीं तर, या कामी कंबरच बांधली होती. त्यांच्यापैकीं भाट, गोंधळी वगैरे लोक या बाबतींत लोकांस सारखे चेतवित होते.
| रामदास तुकाराम वगैरे सत्पुरुषांच्या सहवासांत नेहमीं असल्यानें शिवाजीच्या अंगीं तर हा नवीन आवेश पूर्णपणे भरला होता. ह्या आवेशामुळेंच त्याच्या अंगीं विलक्षण शौर्य आलें. या आवेशामुळेंच लोकांची मनें त्यानें पूर्णपणें आपल्या स्वाधीन करून घेतली. केवळ मुत्सद्दीपणाच्या जोरावर स्वराज्याची स्थापना त्याचे हातून कधीच झाली नसती.
शिवाय शिवानीची बालंबाल खात्री झाली होती की, महाराष्ट्र मंडळांत एकी झाल्याशिवाय मुसलमानांनीं आणलेल्या संकटापासून म्वदेशाची सुटका होणें कठीण. ही गोष्ट शहाजी किंवा दादोजी कोंडदेव यांच्या लक्षांत कशी आली नाहीं नकळे. शिवाजीचा दुर्दैवी मुलगा संभाजी यांस उपदेश ह्मणून ज्या कविता रामदासांनी लिहिल्या आहेत, त्यांत शिवानीचे या बाबतींतील विचार उत्तमरीतीनें व्यक्त केले आहेत. मराठ्यांत एकोपा करून स्वदेश, स्वधर्म या कल्पनांची त्यांस बरोबर ओळख करून देण्याकरतांच शिवाजीनें अविश्रांत परिश्रम केले. महाराष्ट्रास राष्ट्रीय स्वरूप देण्याकरतांच तो झटत होता. शिवानीचा हा हेतु लक्षांत ठेवला ह्मणने त्याचे हातून जी कांहीं आक्षेप घेण्यास योग्य अशीं कृत्यें घडली, त्यांचा बरोबर उलगडा होतो. मराठे सरदारच स्वहिताकडे लक्ष देऊन स्वतःची लहानशी जहागीर किंवा वतन बचावण्याकरितां किंवा वाढविण्याकरितां आपआपसांत भांडूं लागले तर ४०० वर्षांपूर्वी जसें अफगाण लोकांनी महाराष्ट्रास पादाक्रांत केलें तसे मोंगलही करावयास चुकणार नाहींत हें शिवाजीस पक्कें कळून चुकलें होतें. वेळ अशी येऊन ठेपली होती कीं, सर्वांनीं । स्वदेशसंरक्षणाकरतां एक दिलानें झटावयास पाहिजे होतें; ह्मणूनच हिंदु, मुसलमान ; शत्रु मित्र; स्वकीय परकीय; वगैरे भेद बिलकूल मनांत न आणतां ज्याणें ज्याणें या आवश्यक एकोप्यास अडथळा आणला. त्याचे शासन करण्यास शिवाजीनें अगदीं मागें पुढें पाहिलें नाहीं.