मुसलमान इतिहासकार शिवाजीस गलीम लुटारू ह्मणतात. मराठी बखरकारांनी तर शिवाजीस प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतारच मानलें आहे. यवनांच्या जाचानें गांजून जाऊन पृथ्वीनें गाईचें रूप धरून ईश्वराचा धांवा केला, तेव्हां त्या दीन दयाळ परमेश्वराम करुणा येऊन त्यानें अवतार धारण करून आपल्या भक्तांचें रक्षण करण्याचें आश्वासन दिलें व पुढें शिवछत्रपतीच्या रूपानें अवतारून गोब्राह्मणास पररेश्वरांनी मुसलमानांच्या जुलुमांतून सोडविलें असे पुष्कळ बखरींतून लिहिल्याचें आढळतें, अशाच दुस-या वेडगळ समजुतीनें शिवाजीचा उदेपूरच्या राजघराण्याशीं संबंध जुळविण्यांत येते. वस्तुतः शिवाजी केवळ यःकश्चित् लुटारूही नव्हता किंवा परमेश्वराचा अवतारही नव्हता. रजपूत घराण्याशीं जोडलेल्या काल्पनिक संबंधावर त्यास थोरवी मिळाली नाहीं. आईकडून व बायकोकडून त्याचा थोर, शूर, कुलीन घराण्याशी संबंध होता खरा. त्याची आई लखनी जाधवरावाची मुलगी होती व त्याची बायको प्रसिद्ध जगदेवरावनाईक निंबाळकर यांची कन्या होती. पण शिवाजीने जी कीर्ति मिळविली ती खरोखर शहानी व जिनिबाई यांच्या पोटी जन्म घेतल्यामुळेंच मिळविली. अशा आईबापांच्या पोटीं जन्मास येणें हें सामान्य भाग्य नव्हे. या भाग्यापुढें शिवाजीस अवतारी पुरुष ह्मणणें किंवा रजपूत घराण्याशी त्याचा संबंध जोडणें यांत मुळींच महत्व नाहीं. शिवाजीच्या आंगीं त्या काळच्या लोकांच्या सर्व आशा व जोम एकवटला होता. शिवाजी जो पुढें इतका नांवारूपास आला त्याचें खरें इंगित तरी हेंच होय. शिवाजीसारखे पुरुष अकाळीं जन्मास येत नाहींत. राष्ट्रांत एक प्रकारची अनुकूल परिस्थिति येते तेव्हां अशी नररत्नें पैदा होतात. ही परिस्थिति आणण्यास बरीच शतकें प्रयत्न करावे लागतात. ज्या देशांत थोर पुरुषांची योग्यता ओळखून त्यांस मनोभावानें मदत करण्यासारखी लोकांची मनें सुशिक्षित झाली नाहीत, तेथें शिवाजीसारख्या विभूति कधींच निपजावयाच्या नाहींत.
शिवाजीच्या वेळीं भावी सुखाच्या आशेनें लोकांत जो उत्साह उप्तन्न झाला होता, तो त्यांच्यात आढळून येणा-या स्वकार्यदक्षतेचाच केवळ परिणाम नव्हे. शिवाजी गुरु दादोजीकोंडदेव याच्या अंगीं हा वरील गुण पूर्णपणें वास करीत होता. शिवाजीचा आजा लखजी जाधवराव व बाप शहानी हे फार दूरदर्शी होते. त्याणीं आपलें ऐहिक हित चांगले साधलें. वेळ पडेल तशी निरनिराळ्या राजांची नोकरी करून त्यांणी आपला फायदा करून घेतला. परंतु स्वहितावांचून अन्य उदात्त कल्पना त्यांच्या मनांत कधीच आल्या नाहींत. आमच्या बाळ शिवाजीचें मन मात्र आगामी मुखकर काळाच्या आशेनें उचंबळून गेलें होते. शिवाजीस लहानपणापासृन भारत रामायण ऐकण्याचा फार नाद असे. कोठें कथा किंवा एखाद्या प्रसिद्ध पुराणिकाचे पुराण असलें की, तें ऐकण्या करतां तो १०,१० मैल चालत जाई. शिवाजी फार भाविक होता व त्याचा हा भाविकपणा कधींच कमी झाला नाहीं. केवळ स्वहित साधून जन्मसाफल्य होत नाही, आपल्या देशासाठी, आपल्या लोकबाधवांसाठी कांहीं महत्वाचें कृत्य करणें अवश्य आहे, असें जें शिवाजीस वाटे त्यास कारण तरी त्याचा हा भाविक स्वभावच होय. स्वहितास न जुमानतां परहित साधण्याकरितांच आपला अवतार आहे असें शिवाजी नेहमीं ह्मणे. ईश्वरावर पूर्ण विश्वास व धर्मावर निस्सीम श्रद्धा असल्यावांचून अशा उदात्त कल्पनांची मनुष्याच्या मनांत प्रेरणा व्हावयाची नाही. शिवाजीच्या भाविक स्वभावामुळें त्याच्या अंगी विशेष उत्साह उत्पन्न झाला होता. ह्या उत्साहाचे महत्व शिवाजीस बालपणीं बरोबर समजलें नाहीं. लहानपणीं शिवाजीनें जी कृत्यें केलीं, त्यांत बराच विसंगतपणा आढळतो. पण तो जसजसा मोठा होत गेला तसतसे ' ‘आपल्यास कांहीं विशेष कामाकरितां परमेश्वरानें जन्मास घातलें आहे व ती कामगिरी आपण बजाविली पाहिजे' असे विचार त्याचे मनांत खेळूं लागले. तीन सर्वश्रुत प्रसंगीं मिळविलेल्या सर्व संपत्तीवर लाथ मारून मोक्षप्राप्तीकरितां शिवाजीनें अरण्यवास स्वीकारला होता. पण या तिन्ही प्रसंगी त्याचे गुरु व मंत्रिमंडळ यांणी त्यास त्याच्या इतिकर्तव्यतेची बरोबर समजूत करून देऊन, मोठ्या प्रयासानें त्याचें मन पुनः संसाराकडे वळविलें. शिवाजीच्या एकंदर आयुष्यक्रमांत त्याच्यावर पुष्कळच आणीबाणीचे प्रसंग आले. त्यावेळीं त्याच्या हातून लहानशी ही चूक होती तर त्याच्या भावी सर्व आशा निष्फळ झाल्या असत्या. ह्या सर्व प्रसंगी एक परमेश्वरावांचून दुसरा वाटाड्या नाहीं असें समजून त्याणें परमेश्वराचीच करुणा भाकली. परमेश्वर आपल्या अंत:करणांत प्रेरणा करून, आलेल्या संकटांतून निसटून जाण्यास कांहीं तरी मार्ग दाखवील असा त्याचा पूर्ण विश्वास होता. ईशस्तवन करीत असतां त्याच्या अंगांत येई व त्यावेळीं तो जें बोलें, तें त्याचे प्रधान टिपून ठेवीत. ह्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेऊन शिवाजी वागे. ह्या शब्दांप्रमाणें करणें कितीही धोक्याचें असलें, तरी तें करण्यास तो चुकत नसे. ह्या शब्दांवर विश्वास ठेऊनच ते औरंगजेबाच्या स्वाधीन होऊन दिल्लीस शत्रूच्या कैदेत राहिला. ह्या शब्दांवर विश्वास असल्यामुळेंच केवळ कृतांतरूपी अफझुलवानाशीं एकाकी लढण्यास ते डगमगला नाहीं. ह्या संसारत्यागाच्या व अंगांत येण्याच्या गोष्टी ऐकिल्या व वाचल्या ह्मणजे केवळ ऐहिक विचारावर नजर देऊन किंवा एखादा गुप्त हेतु साधण्याच्या हेतूनें शिवाजीनें कोणतेंच काम केलें नाहीं, असें ह्मणणें भाग पडतें. शिवाजीच्या हातून जी कृत्यें घडलीं, तीं मानवी प्राण्याच्या अति उदात्त स्वभावापासून स्फूर्ति झाल्यामुळेंच घडली यांत बिलकुल संदेह नाहीं.