लोकसंख्येंतील या दोन जातींच्या या प्रमाणसंमेलनामुळें महाराष्ट्रांतील धर्म व संस्था ह्यांत जी समता आढळून येते, तशी हिंदुस्थानांत कोठेही आढळून येत नाही. या संस्थांत विशेष लक्षांत ठेवण्यासारखी संस्था ह्मणने ग्रामव्यवस्था होय. परचक्रापुढें हजारों संस्था लयास गेल्या; पण वरील संस्था इतक्या दृढतर पायावर रचलेली आहे की, तिचें स्वरूप अद्यापि कायम आहे. इंग्लिश लोकांनींही ग्रामसंस्था व पंचायत या दोन संस्थांचा आपल्या राज्यपद्धतींत उपयोग केला आहे. या संस्थांप्रमाणेंच दुसरी उपयुक्त संस्था म्हणजे मिरासदारांची होय. हे मिरासदार लोक म्हणजे लहान लहान शेतकरी होत. हे प्रत्यक्ष सरकाराशीं धान्याचा करार करितात. जोंपर्येत नियमितपणें त्यांनकडून जमीन महसूल सरकारास पोंचतो, तोंपर्येत सरकार त्यांच्या हक्कांत हात घालूं शकत नाहीं. ज्या जमिनी त्यांजकडे असतात, त्यांचे ते पूर्ण मालक असतात. ह्या पद्धतीच्या योगानें महाराष्ट्रांतील रयत लोकांत स्वातंत्र्यस्फूर्ति उत्पन्न झालेली आहे. हिंदुस्थानांत दुसरीकडे अशी स्थिति नाहीं. ही मिराशी पद्धति सुरळीत चालली आहे; पण सरकारसारा वसूल करणारे वरिष्ठ दर्ज्याचे वंशपरंपरेचे वतनदार नोकर देशमुख व देशपांडे हे मात्र, त्यांची आतां जरूर नल्यानें, लुप्तप्राय झाले आहेत. इतर ठिकाणचे देशमुख देसाई यांचा पेशा बदलून ते जमीनदार व तालुकदार बनले आहेत. उत्तर हिंदुस्थान व वायव्येकडील प्रांत यांतील ग्रामव्यवस्थेंत व महाराष्ट्रांतील ग्रामव्यवस्थेंन बराच फरक आहे. तिकडे जमीन लोकांच्या समाईक मालकीची असून, सा-याबद्दल वगैरे जवाबदारीही समाईकच आहे. महाराष्ट्रांत असा समाईकपणा आढळून येत नाहीं. व्यक्तिवातंत्र्याचें प्राबल्य तेथें फार आहे. या महत्वाच्या फरकामुळें महाराष्ट्रांतील लोकांत स्वातंत्र्यप्रियता व परस्परात मदत करण्याची इच्छा हे गुण साहजिकच उत्पन्न झाले. अद्यपिही हे गुण त्या लोकांत दिसतात व याच गुणांचा स्वराज्य उभारण्याच्या कामीं त्याम फार उपयोग झाला आहे.
धर्माचें आग्रही स्वरूप महाराष्ट्रांत आढळून येत नाहीं. तुंगभद्रा ओलांडली ह्मणने स्मार्त आणि वैष्णव वगैरे निरनिराळ्या धर्मपंथीयांत जी दुही मानलेली दृष्टोत्पत्तीम येते, तशी महाराष्ट्रांत कोठें दिसत नाहीं. महाराष्ट्रांत हे पंथ जरी एक झाले नाहींत, तरी ते परम्परांचा हेवा न करतां उदासीन अमतात. धर्मबाबींत उदासीनपणा हा या देशाचा विशेष गुण आहे. येथें ब्राह्मण अणि शूद्र एकमेकांत मिळून मिसळून ब-याच प्रेमानें वागतात. गुरु, गोसावी, महंत वगैरे लोकांचे येथें स्तोम दिसत नाहीं. वस्तुतः येथील मूळचे हीन जातीचे शूद्र लोक वैष्णव साधुसंतांचें मत स्वीकारून क्षत्रिय किंवा वैष्णव बनले आहेत. शूद्र, महार वगैरे नीच जातींतही प्रसिद्ध कवी व साधू निर्माण झाले आहेत. ब्राह्मण लोकही या साधूंन भजतात. सर्व देशभर त्यांस मान मिळतो. अशा या उदासीन वातावरणांत रहाणा-या मुमलमान लोकांचाही धर्मवेडेपणा पुष्कळच कमी झाला आहे. हिंदू व मुसलमान एकमेकांच्या उत्सवांत मोठ्या आनंदानें मिसळतात. हिंदु साधुसंतांत मुसलमान फकीरांचीही गणना केली आहे व कांहीं साधुसंतांस तर दोनही जाती सारख्याच प्रेमानें भजतात. अशा प्रकारें स्वमताहून भिन्न धर्मपंथीयांचा छल न करतां, ज्यास जो पंथ आवडेल त्याचा त्यास आनंदानें स्वीकार करुं देण्याचा महाराष्ट्रीयांस जो अनादिकालापासून गुण लागला आहे. त्यामुळें त्यांच्यांत नेहमीं फुट असते. कधींही तंटे बखेडे फारसे मानत नाहींत. तसेंच त्यांस कोणतीही गोष्ट विकोपास न नेतां तिचा शांतपणानें विचार करण्याची फारच उतम संवय लागलेली आहे. लोकांच्या हाडीमांसीं भिनलेले हे गुण त्यांच्या प्रगतीस बरेच कारणीभूत झालेले आहेत यांत शंका नाही.