Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ७५.
माघ व।। ३० १७०१. श्री. ६ मार्च १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं: -
पो। बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जावें. विशेष तुह्मीं छ ३० माहे मोहरम व छ ६ माहे सफरचीं पत्रें पाठविलीं, तें पाऊन सर्व मजकूर समजला. नवाबबहादूर यांची इंग्रजावर जाण्याची सर्व तयारी मुस्तकीम, फौज व तोफखाना व सुतरनाला व घोड्याच्या तोफा व घोड्यावरील बाणदार, दर घोड्यास वर साहा बाणांची कैची व हातीं एक, येणेंप्रमाणें हजारों घोडे व बाणदार, स्वार व बार, भारी भारी तोफा व गरनळा जंगी सामान बेनिहात तर्तूद होऊन तयारींत आहेत. इंग्रजाकडील व वकिलाचे कागदपत्र रदबदलीचे येतात. परंतु श्रीमंतांकडील स्नेहाची अपेक्षा बहुत. स्वारी इंग्रजावर होणार तों अगोदरच इंग्रज व महमदअल्ली सर्द जाले. नमूद जाल्यावर नवाब इंग्रजास सजा चांगली करतील. प्रस्तुत आह्मांकरितां च्यार दिवस मुकाम आहेत. करारनामा व निभावणीचीं पत्रें सत्वर यावीं, ह्मणजे आह्मांस निरोप देऊन नवाब इंग्रजावर नमूद होतात. नवाब आह्मांस काईल करितात कीं, तुह्मांमुळें राहाणें जालें. त्यास, सांडणीस्वार पोहचल्यावर भारी मसलतीवर नजर देऊन, लिहिल्याअन्वयें पत्रें यावीं, ह्मणोन लिहिलें. ऐसीयास, नवाबबहादर यांणीं इंग्रजाचे तंबी करण्याचें सामान भारी केलें आहे. राजश्री माहादजी सिंदे यांणींही तोफा व बाण सुतारनाला हें सामान फार केलें आहे. फौजही कर्डीच जमा केली. नांवबिनांव असाम्या झाडून नेल्या आहेत. घोड्याच्या तोफा व घोड्यावरील बाण हे तर्तूद नवाबांनीं कल्पना काढून चांगली केली आहे. इकडील पत्राचा गुंता ह्मणोन नवाबबहादर शब्द लावितात. त्यास, प्रथम करारनामा पाठविला तो नवाबबहादूर यांचे यादीप्रमाणेंच पाठविला. त्यांत तकरार ह्मणोन दुसरा मसविदा पाठविला. तेव्हां कायेल तुह्मी कसे होतां ? असो. हालीं नवाबबहादर यांसीं पक्का सलुक जाला, याचा लौकिक ही जाला. इंग्रजाची मसलत तंबीची, याजवर नजर देऊन नवाबबहादुर यांणीं मसविदे पाठविले. त्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें छ माहे सफरीं रवाना केलीं, तें पावलीं असतील. इकडील कामें एकदोन जरूरीचीं होणें तें करून घ्यावीं. नवाबबहादरही करून देतील. त्यांचे मर्जीप्र॥ सरकारांतून जाल्यावर त्यांणीं सरकारची कामें करावीं आणि करतील. वरकड खंडणी वगैरे यख्त्यार त्यांजवर. त्यांस लाजम ते करतील. सारांश, इकडील कागदपत्राचा कोणताही गुंता राहिला नाहीं. राजश्री माहादजीराव सिंदे यांजकडील निभावणीचें पत्र येणें. त्यास, ते मोहिमेवर गुजराथ प्रांतीं गेले, ह्मणोन दिवसगत लागली आलियानंतर सत्वरचे रवाना होईल. यासाठींच न गुंतावें. याउपरीं लांबलांब मजलीनें नवाबबहादर यांणीं चेनापट्टणाकडे जाऊन, इंग्रज घाबरे करून, सिकस्त करावे. तरीच इतका सरंजाम केला याचे लौकिक. आणि सरंजामाप्रमाणें नवाब करतीलच. यासही दिवस विशेष नाहींत. जलदीस आतां किंमत आहे. तुह्मीं आपले गुंते उगऊन सत्वर यावें. *नवाबबहादर यांचे मसविद्याप्रा। करारनामा व पत्रें खातरजमेचीं पूर्वींच सांडणीस्वाराबराबर पाठविलीं. त्यांतच सविस्तर लिहिलें आहे कीं, पूर्वीं, नवाबबहादराकडूनच याद आली, त्याप्रा। करारनामा तुह्मांबरोबर पाठविला असतां, कलमें हातीं फिरऊन मसुदा पाठविला. त्याप्रा।। हालीं पाठविला. याचा यख्त्यार नबाबबहादरावरच देऊन लिहिलें आहे. त्यांचे थोरपणास उचित तें करतील. याउपर लौकर चेनापट्टणावर जाणें व्हावें. र।।. छ २९ सफर. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.
पै।। छ १९ रबिलावल.