Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
लेखांक ६९.
१७०१ माघ व।। ७. श्री. २६ फेब्रुआरी १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेषः–तुह्मीं छ २४ छ २७ छ ३० माहे मोहरमचीं पत्रें पाठविलीं तें पावलीं. 'पट्टणास पोहचून नवाबबहादूर यांची मुलाजमत जाली. सर्व मजकूर आह्मीं व राजश्री नरसिंगराव व गोविंदराव यांणीं समजाविला. करारनामा दाखविला. बोलणें ही परस्परें जालें. करारनाम्यांतील एक दोन कलमें यांचे युक्तीस न आलीं ह्मणोन नवाबांनीं करारनाम्याचा व खातरजमेच्या पत्राचा मसविदा ठराऊन दिल्हा, तो पाठविला आहे. त्याप्रमाणें करारनामा व पत्रें यावीं', ह्मणोन विस्तारें लिहिलें. तें सर्व समजण्यांत आलें. ऐसियास, राजश्री नरसिंगराव वकील नवाबबहादुरांकडील सलुखाचें बोलणें सरकारांत बोलूं लागले, निश्चयांत गोष्ट आली. ते समईं सरकारांतून कलमवार याद करून दिल्ही कीं, हे याद तुह्मीं पट्टणास नवाबबहादुरांकडे पाठवावी. त्यावरून मशारनिले यांणीं याद पट्टणास पाठविली. त्या कलमांपैकीं नवाबबहादूर यांणीं बंगाल्यास फौज पाठविण्याचीं वगैरे एक दोन कलमें गाळून, बाकी कबूल करून, त्यांणीं आपले तर्फेची याद पाठविली, त्याप्रमाणें सरकारांतून करारनामा करून दिल्हा. अदवानी वगैरेस उपद्रव न द्यावा इतकें मात्र अधिक आहे. ऐसें असतां हालीं नवाबबहादूर यांजकडून मसविदा आला, त्यांत दोन कलमें मोठींच काहडलीं. तेव्हां, करार राहून नवें बोलणें जालें. सरकारची तों चाल कीं, एक वेळ बोलणें व वचन जालें, ह्मणजे त्यांत फिरोन अंतर यावयाचें नाहीं. दौलतींत अहाद शर्त आणि वचन हा खजाना. ऐसी इकडील समज. श्रीमंत राव पंतप्रधान व नवाबबहादूर यांची दोस्ती व पक्का सलूख जाला. याचा लौकिक बहुत जाला. त्यांत, तकरारी कलमाची दिक्कत आणोन, होय नव्हे ह्मणणें हे ठीक नाहीं, ऐसें समनजोन नवाबबहादूर यांणीं मसविदे पाठविले, त्याप्रमाणेंच करारनामा व निभावणीचीं पत्रें पाठविलीं आहेत. पोहचतील. करार जाला याप्रमाणें आपलाले कार्यावर जावें. नाहींतरी नवाबबहादूर आगोधर चेनापट्टणाकडे चाल करतील आणि आह्मांवर हार्फ ठेवतील. यास्तव, आपण आधीं नमूद व्हावें ह्मणोन, राजश्री माहादजीराव सिंदे व होळकर मातबर फौज बमय तोफखाना व बाण वगैरे पोख्त सरंजामनसीं दरकूच गुजराथ प्रांतीं गेले. हालीं नवाबबहादूर यांजकडून मसविदे आले, त्याप्रमाणें सिंदे यांजकडील निभावणीचें पत्र आलें पाहिजे. याजकरितां मसुदा सांडणीस्वाराबराबर देऊन त्यांजकडे रवाना केला. पत्र सत्वरच येईल. उपरांतीक रवानगी होईल. वरकड निभावणीचीं पत्रें व करारनामा पाठविला आहे. पहिले करारास व हल्लींचे करारास अंतर फार पडतें. खंडणीचें दरोबस्त एकसाल व नवा मुलूक सुटेल तो, पट्टणास लगता, सबब बहादरांनीं घेऊन, सरकारचे लगता मुलूक असेल तो द्यावा, वगैरे नुकसानी आहे. सरकारांत ही पांच साहा वर्षांचा खिसारा आहे. नवाबबहादूर यांसीं दोस्ती जाली. दोहींकडील सलाह तदबीर एक. तेव्हां इकडील खिसारियाची त्यांस फिकीर आहेच. ऐसें जाणून तकरारी कलमांची अख्त्यारी सरकारांतून नवाबबहादरांकडे आहे. त्यांचे उमदेपणास योग्य तेंच करतील. त्यांणीं मसुदे पाठविले त्याप्रों।च इकडून करून पाठविले. लढा ठेविला नाही. * श्रीमंतांचे तर्फेनें थोरपणास उचित तेचं केलें. याउपर नवाबबहादर यांचे थोरपणास योग्य तें करतील. र॥ छ २० सफर. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे. हें विनंति. पै॥ छ ७ रबिलावल, स॥ समानीन मया व अलफ, फाल्गुन मास, मु।। पट्टण.