Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)
पो। छ २ जमादिलाखर. लेखांक १३०. १७०२ वैशाख व॥ ३.
सन इहिदे समानीन श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं :-
विनंति उपरी. बाजीराव बर्वे यांचा मजकूर लिहिला तो समजला. करारनाम्यांत कलम असतां दोस्तीवर नजर राखून त्यास साफ निरोप दिल्हा. यावरून बहुतेक कामाची खातरजमा जाली.कलम १ विसाजीपंत वकील यांची पत्रें चेनापटणाहून यांस येतात कीं, स्वारी येती; ह्मणोन या प्रांतीं गडबड भारी जाली ऐसी येतात ह्मणोन लिहिलें. त्यास, इतकें जालें असतां सुस्तीखालीं दिवस जातात हें ठीक नाहीं. याउपरी त-ही जलदी व्हावी. नाहीं तरी कांहींच काम नाहीं. कलम १
नवाबबहादर वद्य त्रयोदसीस निघणार तोही मुहूर्त राहिला. हें ठीक न जालें. या उपरी तरी जलदी व्हावी. दिवस व्यर्थ गेले. हे सालची सीमाही जाली, आतां दिवस घालवूं नयेत ह्मणजे केले मसलतीचें सार्थक. कलम १
हाती बदामीस पोंहचल्याचें वर्तमान आलें ह्मणोन लिहिलें तें कळलें. कलम १
नवाबबहादर यांस थैलीपत्र आंचीवर पाठविलें तें पावलें असेल. कलम १
फतेसिंगराव गाई(क)वाड यांचा मजकूर लिहिला. त्यांस, त्यांचें राजकारण आहेच, परंतु इंग्रजांकडून निघोन येत नाहींत, त्यांस मिळोन आहेत. तेव्हां प्रमाण कशावरून मानावें ? गोविंदराव गाईकवाड सरदारापासीं आहेतच, त्यांस पद देऊन सर्फराजी होईल. फतेसिंग यांजवळ देशची फौज आहे. लोकांचीं घरें जप्त होतील. इतके दिवस त्यांची वाट पाहिली. याउपरी समजोन होणें तें होईल. कलम १
एकूण कलमें सुमार सहा. र॥ छ १६ जमादिलावल हे विनंति.