Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड एकोणीसावा (१७७९-१७८४)

पो। छ ५ जमादिलावल,                                                लेखांक १०३.                                                      १७०१ चैत्र व॥७
सन इहिदे समानीन                                                      श्री.                                                            २५ एप्रिल १७८०.                                                                                 

राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं--
पो। बाळाजी जनार्दन सां। नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जावें. विशेषः- तुह्मीं फाल्गुण वद्य सप्तमी व अष्टमी व चतोर्दशी व चैत्र शुध त्रितीया व पंचमी ऐसी पांच रवानग्याचीं पत्रें पाठविलीं. ते चैत्र शुध त्रयोदसी चतोर्दशी व वद्य त्रितीयेस पावलीं. लिहिला मजकूर सविस्तर समजला. नवाबबहादर याणीं आपणाकडील करारनामा व निभावणीचीं पत्रें येतांच चेनापट्टणवाले कोशलदार यांस येक येक वस्त्र देऊन रुकसत केले. आपण डेरे बाहेर दिल्हे. तमाम कारखानेवाले यांस तयारीविशीं निकडीची ताकीद जाली. फौजा व पाळेगार यांस बेंगळूरच्या सुमारें येण्याची पत्रें गेलीं. खांसा हि सत्वरच डेरेदाखल होणार. आमचे रवानगीची तर्तूद होत आहे. लौकरच आह्मांस निरोप देऊन आपण चेनापट्टणप्रांतें जाणार ह्मणोन विस्तारें लिहिलें. ऐसीयांस, इंग्रजाचे तंबीची मसलहत कसी, दिवस बाकी किती राहिले, याचा विचार सर्व नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहे. ल्याहावें ऐसें नाहीं. मसलहत ठरून साहा महिने जाले. कागदींपत्रींच लिहिणीं होत गेलीं. येक येक कलमाची तकरार पडली. हालीं नवाबबहादूर यांचे मर्जीनिरूप सर्व घडून आलें. नेमाप्रों। तुह्मांस निरोप देऊन आपण चेनापटणच्या जिल्हांत गेले असतील. त्यांत गुंता नाहीं. पुढें बरसातीस दोन महिने आवध आहे. तों पावेतों इंग्रेजी मुलूक मारून ताराज करावा. राजश्री रावरास्ते यांजकडील मातबर व फौज पाठवणें. त्यास, तुह्मी आलियावर त्यांची रवानगी फौजसह नवाबबहादूर यांजकडे केली जाईल. करारप्रमाणें सरकारची फौज व सरदार गुजराथप्रांतीं जाऊन लढाई हररोज शुरू आहे. भोंसले फौजसह बंगाल्यास च्यारसें कोसांवर गेले. नवाबबहादूर व नवाबनिजामअलीखांबहादूर राहिले. त्यांस नवाबनिजामअलीखां यांची सर्व तयारी जाली आहे. साहेबजादे यांस खेमे दाखल केलें. नवाबबहादूर चेनापटणच्या जिल्ह्यांत नमूद होतांच हे हि सिकाकोलीकडे निघतात. सर्व मसलत सीध. या उपरी दिवस रिकामे जातात, ते व्यर्थ आहेत. सारांश, नवाबबहादर याणीं इंग्रेजावर जरब लौकर जाऊन बसवावी. र॥ छ १९ रबिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.