पै॥ छ १५ जिल्काद लेखांक १९७. १७०३ अश्विन व॥ १.
सन इसन्ने समानीन. श्री. ३ आक्टोबर १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री विनायकपंत दाजी स्वामींचे सेवेसीं-
पो। गणेश नारायण सां। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल त।। छ १४ सवाल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असावें. विशेषः- आपण बहुतां दिवसीं कृपा करून पत्र पा। तें पावलें. लाखोटा पाठविला आहे, हा घरीं बुरबाडास पावता करून जाब आणोन पा। ह्मणून लिहिलें, त्यास लाखोटाच आला नाहीं. पहिला एक लाखोटा आला, तो चिपोळणास भागवतांचे घरीं पावता केला. आपणांस कळावें. सदैव पत्रीं संतोषवित असावें. आपले घरचीं सर्व सुखरूप आहेत. बहुत काय लिहिणें लोभ करावा हे विनंति. बाली लाखोटा आला तो कोकणांत पा। आहे. उत्तर आलें ह्मणजे मागाहून लिहून पाठवूं हे विनंति. पो। आपाजी रघुनाथ सां। नमस्कार विनंति उपरि लि।। लोभ करावा हे विनंति.