पो॥ १५ जिल्काद सन लेखांक १९४. १७०३ अश्विन शु॥ १५.
इसन्ने समानीन. श्री. २ आक्टोबर १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री बाळाजीपंत दाजी व गोपाळपंत दाजी स्वामींचे सेवेसीं:-
पो। खंडो नारायण सां। नमस्कार विनंति. उपरी येथील वर्तमान ता। आश्विन शु॥ १५ पावेतों आपले कृपेंकरून समस्त सुखरूप असों. कांहीं चिंता न करावी. आपणांकडील वर्तमान बहुत दिवस कळत नाहीं. तरी ऐसे न करावें. सदैव पत्रीं सांभाळ करीत असलें पाहिजे. तेणेंकरून समाधान होईल. चिरंजीवाचा सांभाळ करीत असलें पाहिजे. अज्ञान आहे. आणि आपण करीतच असतील. परंतु सूचनाआर्थ लि॥ आहे. वो। राजश्री रामभटजी बापट यांचे घरचीं सर्व सुखरूप आहेत. वाईस जातों, तेव्हां समाचार घेत असतों. सौ. राधाबाई सुखरूप आहेत. कळावें बहुत काय लिहिणें, कृपालोभाची वृद्धि करीत असलें पाहिजे. हे विनंति.