पो। छ ९ जमादिलाखर लेखांक १८९. १७०३ ज्येष्ठ शु. ११.
सन इहिदे समानीन. अलीफ. २ जून १७८१.
राव अजम कृष्णरावजी सा। सलामत रावसाहेब मुषफक मेहेरबान करमफर्मीय मोखलिसान आजी दिल एखलास नूरमहमदखान नोबणी सलाम बादज सलाम. मोहवल मकसूद आ की, येथील खैरसला छ १० जमादिलोवल जाणून साहेबीं आपली खैरखुषी लिहून शादमानी करीत आलें पाहिजे. दीगर, गणपतीराय येथून रुकसत होऊन वाईस गेले, साहेबापासीं पोंहचतील. अजम भुजंगराव यांसही रवाना करोन पाठविलें आहे. आह्मी भुजंगरायावास्ते रुबरु जें काय सांगणें तें पहिलेंच सांगितलें असे, सबब जे हे आपले आहेत. गौर दर बख्त करीत जाणें. साहेब सरदार असा सुबरायाचे मजकूर भुजंगरायाचे जबानीं बयानकर मालूम होईल. हे आपले मर्जीचे खेरीज होणार नाहींत. वर्तणुकेवरी मालूम होईल. बाकी हकीकत यांचे जबानीं सांगतां कळों येईल. हे कीशा मेहेरबानी करोन पोंहचले पाहिजे. दराज काय लिहणें ? बाकी पंताचे जुबानीं सांगून पाठविले मजकूर भुजंगरायाचे जबानींही मालूम होईल. यांचें वळण पाहोन मरम करीत जाणें, प्यार मोहबत असूं दीजे हे किताबती. बाळाजीपंत व गोपाळपंत यांस सलाम.
आज्ञाधारक कोनेरीराव साष्टांग नमस्कार.