पै॥ छ २८ जमादिलावल सन लेखांक १८८. १७०३ वैशाख व॥ १३.
सन इहिदे समानीन. श्रीगणराज. २१ मे १७८१.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य रघुनाथराव नीलकंठ साष्टांग नमस्कार विनंति उपरि. येथील कुशल तागाईत छ २६ जमादिलोवल जाणोन स्वकीय कुशल लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. अलीकडे आपणांकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. साकल्यवृत्त लिहून संतोषवीत असावें. यानंतर आह्मी स्वारीहून काल द्वादशी रविवारीं घरास आलों. आपण हैदरखानाकडे जाणार. त्यास, तीर्थरूप मातुश्रीबाईंची व आपली भेट होऊन बहूत दिवस जाले. यास्तव आपण येऊन मातुश्रीस भेटोन जावें. अगत्य अगत्य यावें. माझी आपली भेट जाली होती, परंतु उभाउभी जाली. मग तुमचा शोध केला तों तुह्मी निघून साता-यास गेलां. मग गांठ न पडली. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे हे विनंति.