पो। छ ६ जमादिलावल लेखांक १८५. १७०३ वैशाख शु॥ ८.
सन इहिदे समानीन. श्री. १ एप्रिल १७८१.
सेवेसीं गणेश केशव सां। नमस्कार विनंति ता।. वैशाख शु।। ८ मंगळवार दोन प्रहर पावेतों मुकाम वेळें, यथास्थित असे. विशेष. सैन्यांत गेलों होतों. सरकारची व यजमानस्वामींची आज्ञा घेऊन माघारें आलों. येथून वाईस गेलों. घरास जाऊन मुहुर्ताचा विचार करून सुमुहुर्तेंकरून श्रीमंत राजश्री दादासाहेबांचा निरोप घेऊन आपणापासीं येतों. मजविषयीं इतःपर सरकारांत पत्र पाठवूं नये. साहित्यसरंजाम करून घ्यावयास चार दिवस लागतील. संभाळून घ्यावें. निरंतर पत्रीं संतोषवीत असिलें पाहिजे. बहुत काय लिहिणें? कृपा लोभ असों दीजे. हे विनंति.