पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १४४. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. राजश्री फतेसिंगराव यांचें राजकारण सरदारांकडे होतें. त्याप्रों। अमलांत येईना, सबब राजश्री गोविंदराव गाईकवाड यांस पदाचीं वस्त्रें द्यावीं, ऐसें सरदारांस येथून लिहिलें; त्यावरून सरदारांनीं गोविंदराव यांस सेनाखासखेल पदाचीं वस्त्रें दिल्हीं. मशारनिलेपासीं तीन चार हजार फौज होती. आणखीं सहा सात हजार फौज आपली देऊन दहा हजार फौजेनिसीं मशारनिले यांची रवानगी महीपार आमदाबादेकडे केली. फतेसिंग यांजकडील सर्व मुलकाची जप्ती करविली. देशांतील लोक त्यांजकडे आहेत. त्यांचे घरीं तसदी देण्यास सरकारआज्ञा जाली. जालें वर्तमान नवाबबहादुर यास समजावें ह्मणोन लिहिलें असे. र॥ छ ४ जमादिलाखर हे विनंति.