पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १४३. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. नवाबबहादुर यांसी दोस्ती जाली. सलामसलत एक. तेव्हां पैहाम इकडील मजकूर समजावा ह्मणोन तपसीलें लिहिण्यांत येतो. तिकडील अर्थ समजत नाहीं. त्यास, ऐसें नसावें. तुह्मीं नवाबबहादुर यांस पुसोन वरचेवर लिहित जावें. र।। छ ४ जमादिलाखर हे विनंति.
* पटवर्धन मंडळी सोडून घ्यावयाविसीं पूर्वीं विस्तरें लिहिलेंच आहे, त्याप्रों। जरूर घडावें. हे विनंति.