पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १४२. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. गणेशपंत बेहेरे सुरतप्रांतीं होते. गाडरकडून दोन पलटणें सुरतेस येण्यास निघालीं. वाटेंतून जातांना गणेशपंतास, त्यांस फासला थोडा राहिला. हेही सावधच होते. रात्रौ त्या पलटणांनीं दुसरे मार्गें येऊन शपखून घातला. गणेशपंत फौजेसह सांभाळून निघाले. कांहीं बुणगे गेले. प्रातःकालीं गणेशपंत याणीं त्यांजवर जाऊन एक लढाई दिल्ही. पलटणें सुरतेस गेली. गाडर बारा पिराचे घांटावरून सुरतेस येणार. मातबर जमाव येईल ह्मणोन गणेशपंत फौजेसह हातगडच्या बारीवर येऊन राहिले. येणेंप्रमाणें वर्तमान आलें. रा। छ ४ ज॥खर हे विनंति.