पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १३८. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराववतात्या स्वामींचे सेवेसीं:--
पो। हरी बल्लाळ सां॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें. विशेष. अलीकडे तुमचें पत्र येऊन वर्तमान कळत नाहीं. त्यास, वरचेवर लिहित असावें. राजश्री पाटीलबावा यांजकडून नवाबबहादूर यांस थैलीपत्र आलें तें दर्शनीच रवाना जालें. पावून नवाबबहादूर यांचें जाणें चेनापट्टणाकडे रुखे जालें असेल. नसलें जाली, आदियाप जलदी व्हावी. नाहीं तरी जाहिराण्यांत नीट दिसत नाहीं. हे सर्व मरातब व दरजे नवाबबहादूर यांचे ध्यानांत आहेत. इकडून ल्याहावें ऐसें नाहीं. गुजराथेकडील व कोकणचें व कितूर व येसाजी सिंदे कुल इकडील, श्रीमंत राजश्री नानांनीं लिहिलें त्याजवरून कळेल. सारांष नबाबसाहेब यांचें कूच जलद व्हावें; जालें असलिया फारच चांगलें.
*र॥ छ ४ जमादिलाखर. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति.