पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १३७. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:--
पो। कृष्णराव बल्लाळ सां॥ नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीये लिहित जावें. विशेष. राजश्री पाटीलबावा यांजकडील पत्रें नवाबबहादर व राजश्री नरसिंगराव व त्रिंबकराव यांस आलीं ते पेशजीं पाठविलीं. पावून नवाबबहादूर यांचें जाणें चेनापट्टण जिल्हियांत जालें असेल. नसलें जालिया आतां त-ही जलद जाणें घडावें. सरंजामी सर्व तयार असतां निघणें होत नाहीं याजकरितां जाहिराणा नीट दिसत नाहीं. हे सर्व दरजे नवाबबहादूर यांचे दिलनिसीन आहेतच. ल्याहावें ऐसें काय आहे ? इकडील सर्व वर्तमान राजश्री नाना यांणीं लिहिलें आहे त्यावरून कळेल. सारांष, नवाबबहादूर यांचे जाणें लौकर होऊन तुह्मी कार्यभाग उरकोन सत्वर यावें.
र॥ छ ४ जमादिलाखर बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे हे विनंति.
राजश्री गणेशपंत स्वामींचे सेवेसीं सां॥ नमस्कार. राजश्री तात्यांनीं दोन वेळ राजश्री नानांस तुमची तारीफ लिहिली. तुह्मीही तसेंच आहांत. सारांष. करारप्रों। सर्व घडवून लौकर यावें. लोभ कीजे हे विनंति.
स्वामींचे सेवेसीं गोविंद भगवंत सां॥ नमस्कार. ममता करीत जावी हे विनंति.