पो। छ १७ जमादिलाखर. लेखांक १३५. १७०२ ज्येष्ठ शु॥६.
सन इहिदे समानीन. श्री. ८ जून १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. राजश्री येसाजी शिंदे व सटवोजी भोंसले व मानाजी फांकडे त्यांस कितूरकर देसाई ऐसे मिळोन माघें सरकार तालुकियास बहुत इजा दिल्ही. हलींही हांगामा मांडला. ऐसें जाणून त्यांचे तंबीस राजश्री परशरामपंत यांची रवानगी केली. मसारनिले यांणीं जाऊन त्यांस तंबी करून त्यांजकडील गुमट व सिरवल हीं ठाणीं मातबर होतीं ते घेतलीं. पुढें सामान गडाकडे गेलें तों तेथें बातनी जाली कीं:–कितूरकर कांहीं जमावानसीं गोकाकेस आला. तेच समयीं परशरामपंत यांणीं धौस पाठविली. फौज जाऊन गोकाकेस वेढा घातला. कितूरकर आंतच आहे हें कळतांच खासाही फौजसह गेले. मोर्चे देऊन बंदी केली. तमाम नाके धरले. तेव्हां देसाई लाचार होऊन मी भेटीस येतों ऐसा पैगाम करून भेटीस आला. हालीं परशरामपंतापासीं आहे. त्याजकडील पेशकशात माघील येणें व सरकार तालुका दाबक याचा जाबसाल होत आहे. फौज गोकाकेकडे जातांच इकडे सटवोजी भोंसले व फांकडे यांणीं हांगामा आणखीं शुरूं केला. त्यांचे पारपत्यास चार हजार फौज पाठविली तेव्हां निघोन गेले. सदरहूप्रों। वर्तमान आहे. तुह्मी नवाबबहादर यांस सांगावें.
र॥ छ ४ जमादिलाखर हे विनंति.