लेखांक १२६.
१७०२ वैशाख व॥ ३. श्री. २१ मे १७८०.
पु॥ राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
पो। बाळाजी जनार्दन सां॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. तुह्मी छ २४ व छ २६ माहे रबिलाखरचीं पत्रें आंचीवर व सुतरस्वाराबरोबर पाठविलीं, तें पावून कुल मजकूर समजला. त्याचीं उत्तरें व इकडील मजकूर अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिला आहे, त्याजवरून कळेल. र॥ छ १६ जमादिलावल. बहुत काय लिहिणें ? लोभ असो दीजे हे विनंति.
पे॥ छ २ जमादिलाखर सन इहिदे समानीन