लेखांक ११७.
१७०२ वैशाख शुद्ध १२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरीः- खुलग्याची लढाई जाली. तमाशा पहावयास नवाबबहादूर यांणीं बोलाविलें. कितेक मजकूर गुजराथ प्रांतींचा वगैरे विचारिला. येथें चर्चा गुजराथची व फितुरी याची मनस्वी उठती. याजकरितां वरचेवर पत्रें येत असावीं. राजश्री बाजीराव बर्वे यांस नवाबबहादर यांणीं निरोप दिल्हा, येथून जावें ह्मणोन साफ सांगितलें, ह्मणोन लिहिलें. ऐसियास, पेशजीं तुह्मांकडील पत्रांचे जाब व इकडील मजकूर सर्व लिहून रवाना केले ते पावले असतील. हालीं गुजराथेकडील व कोकणचे व फितूरीयाचे अलाहिदा पुरवणीपत्रीं लिहिलें त्यावरून कळेल. सरकार व शेहर आहे तेथें मनस्वी गपा उठतच आहे. हे चाल सर्वां ठिकाणीं. परंतु, त्याजवर काय मदार आहे? येथून लिहिण्यांत येईल तें खरें. जनाच्या मुखास हात कोठवर लावावा ? हालीं येथून विस्तारें लिहिलें त्यावरून कळेल. बाजीराव यास निरोप दिल्हा, योग्य केलें. नवाबबहादर यांची व सरकारची दोस्ती जाली. दुसरा प्रकार राहिला नाहीं. तेव्हां इकडील मुखालीफ तो नवाबाचा. तेव्हां समजोन त्यास नवाबांनीं निरोप दिल्हा, फार उत्तम केलें. बाजीरावांनी सरकारचा विरोध असेल, तेथें जाऊं नये, असा बंदोबस्त करून घेतलाच असेल. रा। छ १० जमादिलावल हे विनंति.
पो। छ २६ जमादिलावल सेन समानीन.