लेखांक ११५.
१७०२ वैशाख शु।।१२. श्री. १५ मे १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. सरकारांतून ममईची बंदी करवून खुसकींतून गल्ला वगैरे कांहीं जिन्नस जाऊं न पावे ऐसें केलें. यामुळें ममईस गल्ल्याची बहुत महर्गता जाली. त्यावरून इंग्रजाकडील पांचसातसें माणूस व कांहीं पांच चार तोफा ऐसे बेलापुरास येऊन गला भरला. बेलापूर जागा काईम करोन तालुकियांत शोखी करूं लागले. हें वर्तमान येतांच येथून कांहीं स्वार व गाडद रवाना केली. मागाहून राजश्री बाजीपंत व राजश्री सखारामपंत पानसी ऐसे सरंजामसहित रवाना केले. यांची त्यांची लढाई जाली. सहा घटकापावेतों दुतर्फा तोफांची मारगिरी होत होती. उपरांत इकडून बाणांची मारगिरी करून लोकांनीं नीट चालून घेतले. इंग्रज सिकस्त केले. चारसें माणूस कापून काहडले. पांच जरबा होत्या त्या लुटून आणिल्या. वरक [ड] दारुगोळी तोटे सर्व लुटून घेतलें. येणेंप्रमाणें बातमी आली. बेलापूरही दो चौ रोजांत घेण्यांत येईल. वर्तमान नवाबबहादूर यांस सांगावें. * र॥ छ १० जमादिलावल हे विनंति.
पै॥ छ २६ जमादिलावल, सन समानीन.