लेखांक ८१.
१७०१ माघ व॥ ३० श्री. ६ मार्च १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. तालुके नरगुंद बहुतां दिवसांचे संस्थान. हालीं त्यास नवाबबहादूर यांजकडील अमीलांनीं दाट उपसर्ग केला आहे. तालुका घेऊन पुढें सख्ती करणार ह्मणोन कळलें. त्यावरून लिहिलें असे. तरी तुह्मीं नवाबबहादर यांसीं बोलून, अमीलांस ताकीद होऊन उपसर्ग मना होय, तो अर्थ करवावा. र॥ छ २९, सफर. हे विनंती.
पो। छ १, रबिलावल, सनसमानीन.