पै॥ छ १९ रबिलावल. लेखांक ७६. माघ व॥ ३०, १७०१.
सन समानीन. श्री. ६ मार्च १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या यांसः-
प्रति गोविंद भट निदसुरे आसीर्वाद विनंति. येथील कुशल त॥ छ २९ सफर पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण बहुतां दिवसीं कृपा करून पत्र पो।, तें पावोन परम संतोष जाहला. ऐसेंच सदोदित पत्रीं परामर्ष घेत असावें. या नंतर येथील वृत्त राजश्री आपाजीपंत सर्व लिहितील, त्याजवरून कळों येईल. आमचे कार्याचें स्मरण असेलच. आपण राजश्री नरसिंगरावजी यांजपासीं बोलून ठीक करून यावें. रावजींस आमचा आसीर्वाद सांगावा. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे आसीर्वाद.