लेखांक ७४.
१७०१ माघ व॥ १४ श्री. ६ मार्च १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. इंग्रजाकडील च्यार कुमसेलवाले पट्टणास यावयास निघाले ह्मणोन लिहिलें. त्यास, इंग्रज .... .... याचा ता। पेशजीं लिहिलाच आहे. आणि नवाबबहादुर यांसही त्यांविशीं नक्ष आहे. जात मकरी ह्मणोन त्यांचेच लिहिण्यांत आहे. इकडून ल्याहावें ऐसें नाहीं. टोपीवाले यांची जात फार .... यास्तव त्यांस येऊंच न द्यावें. तालुकियांत आले असलिया नवाबांनीं साफ सांगून पाठवावें कीं, तुमचें प्रयोजन नाहीं. न येणें. याचें कारण ह्मणाल तरी उगीच बातनी तरी घेऊन जातील. त्यांस बातनी देखील पोहचूं न द्यावी. त्यांचे येणें नीट नाहीं, जाणून साफ जाब द्यावा. कलकत्त्याचीं पत्रें सरकारांत येत होतीं, त्यास जाब देणेंच मना केलें. सिलसिला तोडला. तसेंच नवाबबहादर यांणीं करून, येतात त्यांस साफ जाब द्यावा. बलकी वकील चेनापट्टणास आहे, त्यांस इंग्रजांनीं रुकसत दिल्यास त्यांणीं ही निघोन यावें. सर्व दरजे नवाबबहादर यांचे ध्यानांत आहेत. * सिलसिला तोडावा हेंच चांगलें. नाहींतर ही बातमी चोहूंकडे कळून अंदेशे पडतील. मसलत नासेल. सर्व बोलून सिलसिला राखूं नये. र॥ छ २९ सफर. हे विनंति.
पै॥ छ १९ रबिलावल, सन समानीन.