लेखांक ७३.
१७०१ माघ व॥ १४ श्री. ५ मार्च १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. मुसा लाली फरासीस नवाबनिजामअल्लीखां बहादूर यांजकडून कांहीं खतरा आला ह्मणोन, नवाबबहादर यांजकडे पट्टणास आले, मानसन्मान करून ठेविले, जमावही सांगणार, ह्मणोन लिहिलें. एसियास, मुसा लाली माणूस फार चांगला, जवांमर्द, इंग्रजाचे लढाईचे कामावर फार पडेल. त्याची ही उमेद आहे. सरकारांतही त्यास नौकर ठेवावें ऐसें होतें. हालीं नवाबबहादूर यांपासीं गेले, फार चांगलें आहे. जमाव देऊन, इंग्रजाचे कामावर घालवावें. चांगलें कामकाज करील. नवाबबहादूर यांचा तोफखाना बेंगरूळाकडे गेला. मीर रजा जमावसुद्धा पिलरीवर आहेत ह्मणोन लिहिलें, तें कळलें. हालीं मीर यांणीं घांट उतरून अर्काटावर जावें. नवाबबहादर यांणीं चेनापट्टणाकडे जलद जावें. दिवस केवळ थोडे राहिले. निघण्याची त्वरा व्हावी. र॥ छ २८ सफर. हे विनंति.
पै।। छ १९ रबिलावल, सन समानीन.