पै।। छ ७ रबिलावल, लेखांक ७२. १७०१ माघ व।। ८.
सा। समानीन, फाल्गुन मास. श्री. २७ फेब्रुवारी १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:--
पो। कृष्णराव बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष. तुह्मीं छ २४ व छ २७ छ व ३० माहे मोहरमचीं पत्रें पाठविलीं तें पावलीं. सविस्तर म।। सरकारच्या पत्रावरून कळों आला. पेशजीं पट्टणाहून राजश्री नरसिंगराव यांचे विद्यमानें याद ठराव होऊन आली, त्या बमोजीब करारनामा ठराऊन सरकारांतून दिल्ही. एक अदवानीचें कलम अधीक होतें. त्यास, सांप्रत नवे मसुदे आले. पहिल्या करारनाम्यास व हल्लींच्या मसुद्यास तफावत फार आहे, एविसीं राजश्री नानांनीं आह्मांस व राजश्री लक्ष्मणराव आणा रास्ते यांस कायल केलें. तेव्हां समजाविलें कीं, नवाबबहादूर यांसीं दोस्ती जाली, याचा लौकिक फार जाला. हालीं तफावतीच्या कल. मांवरून दिक्कत आणावी हें योग्य नाहीं. ऐसें समजाविल्यावरून त्यांणीं ही हाच विचार ध्यानांत आणोन, नवाबबहादूर यांचे मसुदे आले, त्याप्रों। करारनामा व निभावणीचीं पत्रें पाठविलीं आहेत. तफावतीच्या कलमांची यख्त्यारी सरकारांतून नवाबबहादूर यांजवरच ठेविली आहे. त्यांचे उमदेपणास योग्य आहे त्याप्रमाणें तेंच करतील. राजश्री माहादजीराव सिंदे गुजराथ प्रांतीं गेलेत्यांजकडील निभावणीचें पत्र आणावयाविषीं सांडणीस्वार जोडी पा। आहे, तें लौकरच येईल. उपरांतीक मागाहून रवाना होईल. तुह्मीं कराराप्रमाणें गुंते उगवोन सत्वर यावें. नवाबबहादूर यांचें जाणें चेनापट्टणाकडे जलद व्हावें. दिवस राहिले नाहींत. मिरजकर वगैरे मंडळी व जरूरीचीं सरकारी एक दोन कामें करून घ्यावयाचीं आहेत ते नवाबबाहदूर यांसी बोलून करून घ्यावीं. नवाबाचे मर्जीप्रमाणें सरकारांत विनंति करून त्यांचे मनोदयानरूप कामें जालीं, हें लक्ष नवाबबहादूर यांणीं समजून, इकडील सरकारचे अगत्यांतील कार्यें करून द्यावीं. त्याप्रमाणें करून देतील. गुंता पडावयाचा नाहीं. सविस्तर राजश्री नानांचे पत्रावरून कळेल. * रा। छ २१ सफर बहुत काय लिहिणें ? लोभ असों दीजे. हे विनंति.