पो। छ ७ रबिलावल, लेखांक ६८. १७०१ माघ व।। ७.
सुमासमानीन, फाल्गुन मास, श्रीशंकर प्रसन्न. २६ फे. १७८०.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं:-
पोष्य आनंदराव भिकाजी कृतानेक नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणोन स्वकीय लेखन करीत असिलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावोन संतोष जाहला. ऐसेंच सदैव पत्र पाठऊन संतोषवीत असावें. इकडील वर्तमान, राजश्री गोविंदराव गणपतराव यांचे पत्रावरून कळेल ह्मणोन लिहिलें, तें कळलें. आपलीं पत्रें सरकारांत आलीं व राजश्री गोविंदराव नारायण व गणपतराव केशव यांनी पत्रीं मजकूर लिहिला त्याजवरून सविस्तर कळों आलें. इकडील सविस्तर म॥ राजश्री गोविंदराव व गणपतराव यांचे पत्रीं लिहिला आहे, त्यावरून कळों येईल. निरंतरीं पत्रीं आनंदवीत जावें. रवाना, छ २० सफर. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा. हे विनंति. पोष्य लक्ष्मणराव भिकाजी कृतानेक नमस्कार. निरंतर पत्रीं आनंदवीत जावें. बहुत काय लिहिणें ? लोभ करीत जावा, हे विनंति.