लेखांक ६७.
१७०१ माघ व।। ७. श्री. २६ फे. १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:-
विनंति उपरी. शागीर्दपेशाचे लोक यांचे रोजमरे देणें वगैरे खर्चाविशींचा मजकूर लिहिला, तो कळला. ऐसीयास दोन हजार रुपयांची पट्टणची हुंडी अलाहिदा पाठविली आहे ते पावेल. हुंडीप्रमाणें ऐवज घेऊन खर्च करावा.
र॥ छ २० सफर हे विनंति.
पो। छ ७ रबिलोवल, सन समानीन. फ॥ मास.