पो। छ ७ रबिलावल, लेखांक ६६. १७०१ माघ वद्य ७.
स।। समानीन, फाल्गुन मास श्री. २६ फे. १७८०.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री कृष्णराव तात्या स्वामींचे सेवेसीं: -
पो। हरी बल्लाळ सं॥ नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय लिहित जावें. विशेष. तुह्मीं दोन तीन पत्रें पाठविलीं तें पावलीं. सविस्तर मजकूर श्रीमंतांचे पत्रांवरून समजला. पहिला करारनामा पटणाहून याद आली त्या बमोजीब करून दिल्हा. एक अदवानीचें कलम मात्र अधिक. ऐसें असतां हालीं नवे मसुदे जाले, हें काय ? पहिले करारनाम्यास व हालीचे मसुद्यास अंतर फार. नुकसानी बहुत. परंतु नवाबबहादूर यांसीं दोस्ती जाली याचा लौकीक फार जाला. हालीं आतां दिक्कत घेणें हें योग्य नाहीं. ऐसें श्रीमंतांनीं चित्तांत आणून, त्यांचे मर्जीनुरुप मसुद्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें पाठविलीं आहेत. तकरारी कलमांत नुकसानी. त्याची यख्त्यारी सरकारांतून नवाबबहादूर यांजवरच ठेविली. त्यांचे थोरपणास योग्य तेंच ते करतील. राजश्री माहादजीराव सिंदे गुजराथप्रांतीं गेले. त्यांजकडील निभावणीचें पत्र आणवण्याविसीं सांडणीस्वार पाठविले आहेत. लौकरच पत्र येईल. तें मागाहून रवाना होईल. कराराप्रमाणें गुंते उगऊन तुह्मीं सत्वर यावें. नवाबबहादूर यांचें जाणें चेनापटणाकडे व्हावें. दिवस फारच थोडे राहिले. मिरजकर वगैरे मंडळी व एक दोन सरकारी जरूर कामें करून घेणें, त्याविशीं श्रीमंत नानांनीं लिहिलें. त्याप्र।। नवाबबहादूर यांसीं बोलोन करून घ्यावीं. नवाबाचे मर्जीप्रमाणें सरकारांतून कामें जालीं. त्यापक्षीं नवाबबहादूर ही समजोन, सरकारचीं कार्यें करून देतील. गुंता पडणार नाहीं. सर्व दरजी त्यांचे ध्यानांत आहेत. सविस्तर श्रीमंतांनीं लिहिल्यावरून कळेल. *र॥ छ २० सफर. बहुत काय लिहिणें ? लोभ असों दिजे. हे विनंति. राजश्री गोविंदराव व गणेश-पंत स्वामींस सं॥ नमस्कार. लिहिलें परिसोन, श्रीमंतांचे लिहिल्याप्र॥ कामें अमलांत यावीं. लोभ असो दीजे. हे विनंति.