लेखांक ६५.
१७०१ माघ व॥ ७ श्री. २६ फे. १७८०.
पु॥ राजश्री कृष्णराव स्वामींचे सेवेसीं:--
विनंति उपरी. नवाबबहादूर यांणीं मसविदे पाठविले त्याप्रमाणें करारनामा व निभावणीचीं पत्रें पाठविलीं आहेत. याअन्वयें नवाबबहादूर यांचा करारनामा शफत लिहून सिक्यानसीं करून घ्यावा. मग इकडील द्यावा. निभावणीचीं पत्रें सर्वांचीं पाठविलीं. त्याप्रमाणें त्यांचीं पत्रें सर्व मंडळीस घ्यावीं. त्याची याद अलाहिदा पाठविली, त्याप्रमाणें पत्रें घ्यावीं. र॥ छ २० सफर. हे विनंति.