पो। छ २६ मोहरम, सन समानीन, लेखांक ४७. १७०१पौष वद्य ४.
शुक्रवार, मु ।। श्रीरंगपट्टण. श्री. २५ ज्यानुआरी १७८०.
राजश्रिया विराजित राज्यमान्य राजश्री कृष्णाराव स्वामींचे सेवेसीं:-
पो। कृष्णराव बल्लाळ सां। नमस्कार विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत असावे. विशेषः- तुम्हांकारणें मकरसंक्रमणाचे तीळ शर्करायुक्त पाठविले आहेत. स्वीकारून पावलियाचें उत्तर पाठवावें. र॥* छ १७ मोहरम. बहुत काय लिहिणें ? लोभ कीजे. हे विनंति.