Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड अठरावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८.
१५९३ श्रावण शुध्द ७.
अज दिवाण ठाणे ता। कर्हेपठार पु॥ पुणें ता। मोकदमानी देहाय त॥ कर्हेपठार
१ सासवड | १ पारगौऊ |
१ गुल्हेरी | १ सोनारी |
१ आंबवडी | १ वाघापूर |
३ | ३ |
सु॥ इसन्ने सबैन अलफ जानोजी कुभारकर व एमाजी कुभारकर मोकदम मौजे वणपुरी ता। मजकूर यामध्ये बापभाउवीचे भांडण आहे ऐसियास जानोजी राजश्री साहेबापासी गेला होता ऐसियास राजश्री साहेबी हुकूम केला की मागे माइले दादाजी कोंडदेऊ सुबेदार याचे कारकीर्दीस ऐस चालिले असेली राजश्री साहेबाचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे हाली वर्तवणे. जो न वरते त्यास ताकीद करणे ह्मणौनु रजा फर्माविली तरी तुह्मी हमशाही गोत आहे जैस पेसजी चालविले असेली तेणेप्रमाणे मनास आणोन विल्हे लावणे हरएक मनास आणोन निवाडा करणे सदरहू गोत वणपुरीस राहोन हरएक निवाडा करणे छ २६ रबिलावल
एणेप्रमाणे गोतास हुकूम जालियावरी गोत मौजेमजकूर एऊन दोघांचे राजीनामे लेहोनु घेतले बित॥ + + + + + + + + + + श्रीसके १५९३ विरोधकृत नाम संवत्सरे स्त्रावण सुध सपतमी हजर मजालसी मौजे मा। मोकदम देहाय सु॥ इहिदे सबाईन
१ पारगौ | १ सासवड |
१ उन्हेरी | १ सोनारी |
१ वाघापूर | १ आंबवडी |
एणेप्रमाणे गोतहुजूर तकरीरकर्दे
अगरवादी रतन प॥ बिन जान पा। मौजे वणपुरी ता। कर्हेपठार राजी होऊन राजीनामा लेहौनु दिधला ऐसा जे एसाजी कुंभारकरामधे व आपणामधे मोकदमीबदल भांडत होते त्यास माहाराज साहेबी फर्माविले की मौजे म॥ बारा हि बलुते सांगतील त्याप्रमाणे वर्तवणे बलुते गोही देतील त्यास आपण राजी आहे गोहीदाराचे जरी मोडून तरी साहेबास गुन्हेगारी होनु १०० एकसे देऊन व गोताचा खोटा राजीनामा सही |
पछमवादी एमाजी कुभारकर मौजे वणपुरी ता। कर्हेपठार त॥ म॥ राजीनामा लेहौनु दिधला ऐसा जे जाणोजी बिन रतनोजी कुभारकर व आपणामधे मौजे म॥ मोकदमीचे भांडण आहे त्यास माहाराज राजश्री साहेबाचा हुकूम की गावीचे बलुते + + गाही देतील तेणेप्रमाणे वर्तन जरी बलुते सांगतील ते नाइको तरी दिवानाची गुन्हेगारी होनु १०० एकसे देऊन हे तकरीर सही |
एणेप्रमाणे राजीनामा लेहोनु देऊन मग गोताने गावीचे बलुते बोलाऊन त्यास पुसिले बित॥
१ साजाजी सुतार | १ कुवरवा |
१ बहीर माहाला | १ रंभाजी मावली |
१ नूल माहार चांभार | १ बहरिजी जाचक |
१ खंडनाईक माहार | बिल्हराऊतराऊ |
------- ४ |
------ ३ |
हे सातजण यास बलाऊन हकीकती लिहिली जे पेसजी माहाराज राजश्रीचे व दादाजी खंडदेऊ व मुधोली भोसले मुकासी ते वेळेसी मोकदमी कोने केली तरी ते वेळेसी रतनजी बिन तान्हाजी यानी मोकदमी केली असे हे सदरहू प्रमाणे मोकदमीचे खावंद जानोजी बिन रतनोजीची मोकदमी खरी यास जो हिलाहरकती करी तो दिवानीचे गुन्हेगार होनु ५०० पाचसे देईल व गोताचा दंड देईल हे लिहिले सही