लेखांक ५०.
श्री.
१६४१ माघ वद्य ८.
ε म॥ अनाम देशमुख व देशपांडे प्र॥ पुणे यांसि बालाजी विश्वनाथ प्रधान सु॥ अशरैन मया अलफ राघो बाबाजी व माहादाजी बाबाजी काले यानी मौजे वालकी त॥ सांडस प्रा। मा।र येथील कुलकर्ण व जोतिश विकत घेतले आणि हुजूर सेरणीचा निर्वाह करून दुमालेपत्र करून घेतले नाही ह्मणऊन हुजूर विदित जाले त्यावरून मौजेमजकूरचे मोकदम व राघो बाबाजी काले यांस तलब करून मनास आणितां गुणाजी बिन कृष्णाजी व भिवजी बिन जावजी पाटिल मोकदम याने विदित केले की आपणावरी तान्हाजी व नेबाजी घवे एजुर्वेदी कुलकर्णी याचे जमानती बाबती आठसे रुपये आपणावरी पडिले त्यास तान्हाजीचे बुडाले पैके द्यावयासि कोणी त्याचे नाही ह्मणऊन आपण राघो बाबाजी काले यासि कुलकर्ण व जोतिश विकत देऊन पैकियाचे लिगाड वारिले आहे. साहेबी मनासि आणून सेरणीचा निर्वाह करून कुलकर्ण-व-जोतिष-वतनाचा महजर व दुमालेपत्र करून द्यावयासि आज्ञा केली पाहिजे ह्मणऊन विदित केले. त्यावरून राघो बाबाजी काले याकडे सेरणीची खंडणी रुपये ४५२ च्यारीसे बावन रुपये निर्वाह केला आहे गोताचा महजर जाला पाहिजे याकरितां हे पत्र तुह्मास सादर केले असे तरी चौकसीने मनासि आणून गोताचा महजर करून देणे आणि महजर व राघो बाबाजी काले यास हुजूर पाठऊन देणे मनासि आणून दुमालेपत्र करून दिल्हे जाईल सदरहू सेरणीची बेरीज स्वराज्य व मोगलाई व सरदेशमुखी साहोत्रा देखील करार केली असे छ २१ रबिलाखर प॥ हुजूर सुरू सूद