लेखांक ४८.
श्री.
१६३६ फाल्गुन वद्य ११.
॥ ε म॥ अनाम देशमुख व देशकुलकर्णी प्रा। पुणें यांसि नारो शंकर सचिव सु॥ खमस अशर मया अलफ. ठाणेमजकुरीची स्वारी मौजे भावली ता। मुठेखोरे एथे आली त्याणी गाव गाव हि लुटिला व फलटणकर वाणी मार्गे एत होते तेहि लुटिले व गडीच्या घेराची गुरें ४० चाळी गार्हाचे रानातून नेली आहेत ऐसियासि ठाणाचा कारबार नेहमी असोन त्याणी ऐसी धामधूक करावी हे गोष्टी बरी नाही भावलीकडे बाकी होती तरी घेत घ्यावी होती आजी गैरहंगामी स्वारी पाठऊन गाव लुटिला वरकड मुलकास दहशत घालून कुल गाव उठविले हे गोष्टी कोण केली आहे याउपरि तुह्मी त्यास सांगोन भावलीची वस्तभाव परतोन देवणे व घेराची गुरे नेली आहेत ते आणावयास शंकराजी पायगुडे पाठविले आहेत तरी गडकरियाची गुने देवणे व बकाल लुटिले आहेत त्यामुळे मार्ग पडिला याकरिता त्यांची बिशाद देवणे एविसी अंतर पडो न देणे. छ २४ रबिलोबल पै॥ छ २६ रबिलोवल.
लेखांक ४९.
१६३८ आश्विन वद्य १३.
तकरीरकर्दे मल्हारभट काळे ग्राम रुगवेदी ब्राह्मण का। पुणे सु॥ सन हजार ११२५ कारणे जे राजग्रहीचे व देशमुख व देशपांडिये व व्यापारी व रुगवेदी व भिक्षुक व उदमी रुगवेदीयांचे घरीचे उपाधेपण व जोतिष व अस्टाधिकार + + + + + जो ज्याचा उपाध्या त्याचे आहेत ज्याचा उपाध्या हाजीर नसेल त्याचे उपाधेपण व जोतिष व अस्टाधिकार धर्माधिकारी व अस्टघरीयाचे आहे आपण खात आलो आहो ए गोस्टीस अन्यथा असेल तरी दिवाणचे अन्याई असो हे तकरीर लिहिली सही.
तेरीख २६ सवाल