लेखांक ४५.
श्री
१६२८ अधिक ज्येष्ठ वद्य ८.
द॥ बे॥ राहूजी पाटिल जगथाप मोकदम कसबे सासवड सुहुरसन सीत मया अलफ कारणे साहेबाचे सेवेसी लेहून दिल्हा कतबा ऐसा जे आपण व नारायणजी देसमुख व मालजी पाटिल ऐसे तिघेजण चिंतो माहादेऊ याचे भेटीस हिसेबाबद्दल पुरंधरास गेलो आणि त्यास चिंतो माहादेऊ याणे गडावरी च्यार रोज आंधारीमधे अटकेत ठेविले आणि कसबा जाहागीर आहे तनखा भरून देणे ऐसे दबाऊन साहा हजार रुपयाचा कतबा लेहून घेतला व आपली कुलकर्णाची गोही द्याल तरी सदरहू पैकियाची सोडी मोकल करीन ऐसे बोलिला त्यावरून मालजी पाटिल आपणास बोलिला की प्रसंगावरी नजर देऊन गोही देणे ऐसे बोलिला त्यावरून आपण मालजीच्या बोले चिंतोपंताची कुलकर्णाची गोही दिल्ही आहे * त्यापण राजीपणे त्याची गोही दिल्ही असेल तरी गुन्हेगार असो मालजी पाटिलाच्या बोले गोही दिल्ही व त्याच्या कागदावरी सिका नारायणजी देसमुख करीत नव्हता परंतु मालजीच्याच बोले कागदावरी सिकाहि करून दिल्हा आहे हा कतबा सही
साक्ष
गोविंद माहादेऊ देसकुलकर्णी | चिंतो माहादेऊ देसकुलकर्णी |
प्रा। वाई १ | प्रा। सिरवल १. |
अर्जोजी धोडा मोकदम | नारो त्रिमल देसकुलकर्णी |
मौजे चिखलगाऊ ता। खेड १ | ता। गुंजण मावल १ |
बापूजी माली मोकदम मौजे | |
नायगाऊ प्रा। सिरवल १ | |
तेरीख २१ माहे सफर |