लेखांक ४२.
१६२३ आषाढ वद्य १४.
श्री चिंतामण गोसावी यासि :-
फारखती राजश्री बालाजीपंत व मोरोपंत देसपांडे प॥ खेडबारे यांसि रामचंद्र बाबाजी व विसाजी त्रिंबक व कृष्णाजी बाबाजी देसपांडे प॥ पुणे नमस्कार सु॥ सन हजार ११११ कारणे फारकत लेहोन दिधली जे आमचे कर्ज र॥ चिमणाजी बापूजी आमचे भाऊ यावरी होते त्याची खते बजिनस आह्मापासी आहेत यास तुह्मी लिगाड वारावयास दरमियान श्री श्रीदेऊ स्वामीचे पुत्र यास दरमियान घालून + + केला रु॥ २००० दोन हजार सदरहू रुपये आपण तुह्मापासून घेतले आणि लिगाड वारिले सालीन हाल र॥ चिमणाजीपंताजी खते जे असतील ते रद असेत त्याचे लिगाड तुह्मासी लावणार नाही. हे फारखती लिहिली सही छ २७ सफर आसाड वदि चतुरदसी.
लेखांक ४३.
१६२३।१६२४.
हिसे फसली मौजे थेरवडी पा। रासीन स॥ अहमदनगर सुभे खुदस्तेबुनियाद
सन हजार ११११ सन ४६
जलूसवाला जमाबंदी रुपये २०१
हिसे विसाजी त्रिमळ | हिसे खालसा ता। विसाजी |
दाम १२०००० | त्रिमळ निस्या रबीयुतवल |
मोकरा जमाबंदी रु॥ | मु॥ ३ माहे पाय दाम |
२०१ तगीर निस्या रबी- | बमोजिब जमाबंदी रु॥५० |
युतवल मु॥ ९ माहे | बरदास्त मजमूदार |
हिसे जागीरदार ए॥ रु॥ १५१ |
सन १११२ सन ४७
मोकरा दाम १२००००
जमाबंदी म॥ रुपये २५९
हिसे विसाजी त्रिमळ | हिसे खालसा तगीर |
इ॥ सु॥ ७ रबीयुतवल | इ॥ सु॥ ७ रबी |
मु॥ ५ माहे ब॥ जमाबंदी | मु॥ ७ माहे दर माहे |
दर माहे रु॥ २१॥= ए॥ रु॥ १०८ | रु॥ २१॥=ए॥रु॥१५१। = |
बरदास्त करोडी बाजगीर्दनचा परवाणा व जागीरीचा परवाणा करोडियास अवरंगाबादेहून एईल तेव्हां मागोन घेतले जाईल.