लेखांक ८४.
श्री.
'' अखंडित लक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री खंडो मल्हार गोसावी यांसि :-
सेवक चिमणाजी नारायण सचिव नमस्कार सु॥ सन सबा सलासैन मया व अलफ. नारायणजी जुंझारराऊ देशमुख ता। कानदखोरे यासी पत्र लिहिलें, तेंच बजिनस तुह्माकडे आलाहिदा पाठविले आहे. त्यावरून अभिप्राय कळेल. तर तुह्मी व जिवाजी मरळ त्याकडे जाऊन वतनावरीं घेऊन येणें. ये गोष्टीस विलंब न लावणें. देशमुखाची रवानगी करून, तुह्मी पुढें मसलतीस जाणें. त्याच्या चित्तांत संकल्पविकल्प त्याचे परिमार्जन तुह्मी करून घेऊन येणें. येविशई स्वमुखें तुह्मांस सिंहगडचे मुकामीं आज्ञा करणे ते केलीच आहे. या उपर विलंबावरी न घालितां जुंजारराव माहालांत येत तें करणे. छ १ सफर पा। हुजूर.''
लेखांक ८५.
श्री.
'' आज्ञापत्र समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री चिमणाजी पंडित सचिव ता। मोकदम मौजे धानेब ता। कानदखोरें सु॥ समान सलासीन मया अलफ दिल्हें वतनपत्र ऐसे जे, तुझे बाबें देशमुख व देशकुलकर्णी ता। मजकूर यांणी पेसजी हुजूर नेराचे मुकामीं येऊन विनंती केली कीं, ता। मजकूरचे गावगनाचे कामथ आहेत. तीं सेतें खोतीकडे रकमेस बावेलीयाखालें वोढत आहेत. त्यास गावगनाच्या मोकदमास वतनसंबंधें कसाला पडतो व मोकदमीच्या वावेलीयाची व कामथसेताची तिजाई रकमप्रमाणे सालदरसाल पाटिलास वसूल पडतो. परंतु कामथ सेत पाटिलाच्या दुमाला पडत नाहीं. याकरितां स्वामीनीं मनास आणून, कामथ सेत मोकदमाच्या दुमाला करून, याचे जीवनमाफिक सेरणी करार करून, भोगवटियास वतनपत्रें सादर केलीं पाहिजेत. ह्मणऊन विदित केलें. त्यावरून मनास आणितां, देहाये मजकूरच्या मोकदमास वतनामुळें कसाला जबर पडतो, आणि कामथसेत मोकदमाच्या दुमाला पडत नाहीत, हे गोष्टी खरीच आहे. याकरितां तुजवरी कृपाळू होऊन मौजे मजकूरचे खोतीला कामथसेत रकम कास मण .।१ साहा मण, पैकी वजा देशमुख मण ६३ तीन मण, बाकी तीन मण तुझे दुमाला केले असे. तरी सदरहू कामथ सेत पुत्रपौत्रादि वौंशपरंपरेने अनभऊन सुखरूप राहाणे. ये बाबें तुझे माथा सेरणी जीवनमाफिक दुतर्फा देखील बाबती रुपये ३६६= छेतीस रु॥ चवल करार केले असेत. सदरहूची उगवणी करून पावलियाचा हुजत घेणे. तेणेप्रमाणें मजुरा असेत. छ १० मोहरम पा। हुजूर.''
बार सुरु सुद बार.