लेखांक ८२.
श्री.
'' ॥ε म॥ अनाम देशमुख व देशपांडे ता। कानदखोरे यांस नारो शंकर सचिव सु॥ सन अर्बा सलासैन मया अलफ. रायगडाचे मदतीस लोक मावळप्रांतीहून हशमाचा जमाव वतनदार चाकरलोक आहेत, त्यापैकी एक हजार लोक रवाना करणें ह्मणून राजश्री स्वामीनीं आज्ञा केली आहे. त्यावरून हें आज्ञापत्र सादर केलें असे. तरी तुह्मीं लोक १५ पंधरा मर्दाने माणूस पाहून, ब॥ एक सरदार नावाचा माणूस देऊन, लोकांची रवानगी राजश्री आनंदराऊ याजकडे रवानगी करणे. हे काम बदलामीचे आहे ऐसे स्पष्ट जाणून लोक रवाना करणे. लोकास तूर्त खर्चास राजश्री रंगो रघुनाथ ब॥ स्वारी याजब॥ रुपये देऊन पाठविले आहेत. त्यास, मा।रनिले सदरहू रु॥ तुह्मास देतील. ते लोकाचे पदरीं घालून, आधी लोक रवाना करणे. मा।रनिले तुह्मास लोकांचेविशीं सांगतील, ते स्वमुखीची गोष्ट जाणून लोकांचेविशीं ढील न करणे. या कामास सेख मदारी व करीमखान हुजरात प॥ यास रुपये १ एक रास देविला असे. अदा करणे. छ ९ रमजान पा। हुजुर.''
सुरु सुद बार.
लेखांक ८३.
श्री.
'' ε मा। अनाम देशमुख व देशपांडे ता। कानदखोरे यांस नारो शंकर सचिव सु॥ सन अर्बा सलासीन मया अलफ. राजश्री स्वामीनीं पाचाडचे ठाणे स्वाधीन करून, राजश्री आनंदराऊ बहिरव पाठविले आहेत. यासमागमें मावळ प्रांतेचा व गडकिलाचा जमाव नेहमीं नेमणुक केली आहे, त्यापैकी तर्फमजकुरावरी तुह्माकडे लोक ५ पाच नेमणूक करून दिल्हा आहे. त्यापैकी बरकंदाज १ अढा व पंचरूढ हतेरी च्यार असामी नेमिले असेती. सदरहू पैकी पाचाडचे ठाणियांत लोक आहेत. त्यास, दोन अडिच महिने होऊन गेले; याउपर ते लोक तेथे राहाणार नाहीत. याकरिता हें आज्ञापत्र तुह्मास सादर केलें असे. तरी सदरहूप्रमाणे लोकांची नेमणूक करून भादवापर्यंत नेहमी लोक पाचाडच्या ठाणियास पाठऊन देणे. कदाचित् लोक तिकडून न आलेच, तरी दुसरे मुबदले वरच्यावरी रवाना करणें. छ १७ जिल्हेज पा। हुजूर.''