लेखांक ७९.
श्री.
''राजश्री नारायणजी जुंझारराऊ देसमुख ता। कानदखोरें गोसावी यांसि
॥ ε श्रो। अनंदराऊ बहिरव आसिर्वाद सु॥ इसने सलासीन मया अलफ. तुह्मी पत्र पाठविलें, ते प्रविष्ट जाले. रा। खंडोपंत याबरोबर मुखोद्गात कितेक वर्तमान सांगोन पाठविले. त्यावरून आद्यंत कळलें. ऐसियास तूर्त तुह्मास येथे बोलवावे तरी दंगा बहुत आहे. त्यास कार्तिकमासी राजश्री पंताची स्वारी किले सिंहगडास होणार आहे. ते समई तुह्मास बोलाऊन, काय ते वर्तमान मनास आणून निर्वाह केला जाईल. कदाचित् राजश्री पंताची स्वारी नव्हे तरी आह्मास तो खामसा यावे लागते. मग तुमचें कार्य विल्हे लावून दिल्हे जाईल. तुह्मी कांही चिंता न करणें. येथील वर्तमान रा। खंडोपंत सांगतील कळेल. रा। छ ७ माहे रविलाखर.''
लेखांक ८०.
श्री.
'' राजश्री नारायणजी जुंझारराऊ देसमुख ता। कानदखोरे गो। :-
'' अखंडित-लक्ष्मी-आलंकृत-राजमान्य श्नो पिलाजी जाधव रामराम येथील कुशल जाणून स्वकीय लिहिणे. यानंतर पत्र पाठविले. लि॥ कीश् शामलाने जागडे वतनदार पाठविले. तुह्माकडील आश्रा कळोन रुपयाचा भरवसा त्यास जाला आहे. ह्मणून कितेक लिहिले. ऐसियास कितेक वर्तमान कृष्णाजी जाधव याजपासी सांगितले आहे. आह्मी दसरा जालियावरी दहा पंधरा दिवसां कूच करून मुलुकगिरीस जाऊन, तेव्हां एक जण एका बसऊन आह्माबरोबर पाठवणें. मग लष्करांत कळेल तैसा निकाल काढून, से दोन से जे होतील ते करून देऊ. येथे कांही रुपयाची अनुकुलता होणार नाहीं. याजकरितां आह्मी विचार काढिला आहे. तजविजेनेच शामलाचे रु॥ वारेत ऐसे करून. कांही फिकीर न करणे जाणिजे. रा। छ ४ माहे सफर बहुत काय लिहिणे हे विनंती.''