लेखांक ६७.
श्री.
जाबता हक देशमुख ता। कानदखोरे अज बेरीज
हक निमे समंधे गावगना अज देहे ३४
यासि दस्त अलाहिदा गांव नेहटणीस जमा केले नाही, सबब राहनीकाजकीर्दी माहादाजी अनंत सुभेदार प्रा। मावळ हाहि एकंदर गांव खाले जमा करविले, तेणे प्रो। चालू असे सबब; अलाहिदा जमा नाही.''
लेखांक ६८.
श्री.
''राजश्री नारायणजी जुंझारराव मरळ देशमुख ता। कानदखोरे गोसावियासी-
॥ ε श्ने॥ आनंदराऊ बहिरव आशिर्वाद सु॥ सन अर्बा सलासैन मया अलफ तुह्मी एथे राजपुरीचे मोहिमेस चाकरीस बावाजीराव मरळ पाठविले होते. त्यास, ते रजा घेऊन गेले. ते समई त्याणीं बावजी ऐणपुरे ठेऊन गेले. त्यानीं आजीपावेतो चाकरी केली. त्याचे मुबदले त्र्यंबकजी सिंदे पाठविले. त्यापासीं सेवा घेऊन बावजीस निरोप द्यावा, तो त्र्यंबकजीस वेथा जाली. याकरितां बावजी ठेऊन घेतला. तो चाकरी करीत असता, त्यास हि वेथा होऊन आजी छ मजकुरीं मृत्यु पावला. बावजीनें एकनिष्ठेने चाकरी केली आहे. याचे अगत्य चालवावे लागते. याकरितां हे पत्र तुह्मास लिहिले आहे. बावजीच्या मुलामाणसांचे चालवावयासी अंतर न करणे. * आह्मी तिकडे आलियावरी त्याचे मुलाबाळास कांहीं इनाम दिवाणांतून काढून देऊ. चोखट माणूस गेला. उपाय नाही. छ ५ जमादिलाखर. हे विनंती.''